latur | Sarkarnama

विजयी गुढीसाठी निलंगेकरांचा पाडव्याचा मुहूर्त

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 27 मार्च 2017

लातूर ः नगरपालिका, जिल्हा परिषदेत सत्ता मिळवल्यानंतर महापालिका निवडणुकीत विजयाची गुढी उभारण्यासाठी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी पाडव्याचा मुहूर्त निवडला आहे. महापालिका निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्यांचे अर्ज उद्या (ता. 28 ) पासून भाजपच्या वतीने स्वतः निलंगेकर स्वीकारणार आहेत. 

जिल्हा परिषद निवडणुकीत बहुमतासह सत्ता मिळवल्यानंतर भाजपचा आत्मविश्‍वास बळावला आहे. त्यामुळे महापालिकेत कॉंग्रेसला पराभूत करुन जिल्ह्यावर निर्विवाद वर्चस्व स्थापन करण्याचा निर्धार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केला आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेतील आजी, माजी नगरसेवक पदाधिकाऱ्यांनी पक्षात घेऊन महापालिकेत झिरो असलेल्या भाजपला हिरो करण्याचा प्रयत्न जोरकसपणे केला जात आहे. सातत्याने पराभव होत असल्यामुळे कॉंग्रेसच्या बुडत्या जहाजात कुणाचीही बसण्याची इच्छा नसल्याने कॉंग्रेसला सुरुंग लावण्याचे काम भाजपने केले.

त्याला रोखण्यात अमित देशमुख काही अंशी यशस्वी झाले होते. त्यानंतर संभाजी पाटील यांनी आपला मोर्चा राष्ट्रवादी व शिवसेनेकडे वळवला होता. आता महापालिका निवडणुकीत कमळ फुलवत विजयाची गुढी उभारण्यासाठी निलंगेकरांना पाडव्याचा शुभ मुहूर्त निश्‍चित केला आहे. त्यानुसारच मंगळवारी गोलाईतील जगदंबा मातेला नारळ वाढवून व हजरत सुरतशहावाली दर्ग्यात चादर अर्पण करुन भाजप प्रचाराचा शुभारंभ करणार आहे. त्यानंतर इच्छुकांचे अर्ज कस्तुराई मंगल कार्यालयात स्वीकारले जाणार आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख