lathicharge at chandni chowk in Pune | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

आंदोलकांवर पुण्यातील चांदणी चौकात पोलिसांचा लाठीमार, अश्रुधूर #MaharashtraBandh

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

पुणे : मराठा आंदोलनाला पुण्यात आज हिंसक वळण लागले. पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात जमावाने तोडफोड केली. त्यानंतर चांदणी चौकात आंदोलक आक्रमक झाले. त्यांनी दगडफेक केली. त्यामुळे पोलिसांना लाठीमार करावा लागला. तो आटोक्यात येत नसल्यान अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. 

पुण्यातील आंदोलनात आज मोठ्या प्रमाणात घडामोडी घडल्या. राज्याच्या इतर भागात तुलनेने शांततेत आंदोलन सुरू असताना पुण्यात त्याला वेगळे वळण लागले. जिल्हाधिकारी कार्यालयातील मोर्चा संपल्यानंतर काही तरुणांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला.

आंदोलन आजच्या शेवटच्या टप्प्यात असताना चांदणी चौकत मोठ्या संख्येने तरुण जमले. त्यांनी महामार्ग बंद केला. टायर जाळले. नंतर दगडफेक सुरू केली. पोलिसांना आंदोलकांना आटोक्यात आणण्यासाठी लाठीमार केला. त्यानंतर आंदोलकांची पळापळ झाली. आंदोलकांच्या दगडफेकीत काही पोलिसदेखील जखमी झाल्याचे वृत्त आहे.

पुण्यात वेगवेगळ्या टापूत आंदोलने घडत आहेत. त्यामुळे पोलिसांनाही त्यावर काबू मिळवणे अवघड झाले. संयोजकांच्याही हाताबाहेर परिस्थिती गेली आहे. आंदोलक हे बाहेरून आले होते, असा दावा सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आला.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख