काकासाहेब शिंदेच्या स्मृतीदिनी जिल्हा परिषदेकडून कुटुंबियांना पाच लाखांची मदत 

.
काकासाहेब शिंदेच्या स्मृतीदिनी जिल्हा परिषदेकडून कुटुंबियांना पाच लाखांची मदत 

औरंगाबादः मराठा आरक्षणासाठी हुतात्मा झालेल्या काकासाहेब शिंदे यांचा आज प्रथम स्मृतीदिन. या निमित्ताने कायगावटोका पुलावर त्यांचा पुतळा बसवण्यात आला. यावेळी त्यांना अभिवादन करण्यासाठी हजारो समाज बांधवांनी गर्दी केली होती.

पहिल्या स्मृतीदिनाचे औचित्य साधत औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या वतीने काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबाला जाहीर करण्यात आलेली पाच लाख रुपयांची आर्थिक मदत आज सुर्पूद करण्यात आली. 

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ऍड. देवयानी डोणगांवकर यांच्या हस्ते ही रोख मदत  काकासाहेब शिंदे यांचे बंधु, आई व इतर कुटुंबियांकडे  पाच लाख रुपयांची रोख आर्थिक मदत देखील सुर्पूद  करण्यात आली.  

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गंगापूर तालुक्‍यातील कानडगांव येथील काकासाहेब शिंदे यांनी 23 जुलै 2018 रोजी हौतात्म पत्करले होते. आरक्षणाच्या मागणीसाठी जलसमाधी आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. यासाठी कायगांव टोका येथील गोदावरी नदीच्या पुलावर मोठ्या संख्येने आंदोलक जमले होते. यावेळी काकासाहेब शिंदे यांनी गोदावरी पात्रात उडी घेतली होती, यात त्यांना हौतात्म प्राप्त झाले होते. 

शिंदे कुटुंबातील कर्ता तरूण, आधार गेल्यामुळे जिल्हा परिषदेच्या वतीने या कुटुंबाला पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली होती. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत गेल्यावर्षी हा निर्णय घेण्यात आला होता. औरंगाबाद-पुणे महामार्गावरील कायगाव टोका येथील गोदावरी नदीच्या "हुतात्मा काकासाहेब शिंदे सेतू' वर आज त्याच्या स्मृतीदिनी काकासाहेब शिंदे यांचा पुतळा उभारत त्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. 

मराठा क्रांतीमोर्चाचे समन्वयक व शेकडो समाज बांधवाणी आज या ठिकाणी येऊन काकासाहेब शिंदे यांना अभिवादन केले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ऍड. देवयानी डोणगांवकर, उपाध्यक्ष केशवराव तायडे, जिल्हा परिषदेचे गटनेते अविनाश गलांडे, कृष्णापाटील डोणगांवकर, युवासेनेचे संतोष माने यांनी देखील काकासाहेब शिंदे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत त्यांना श्रध्दांजली वाहिली.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com