...मग वॉर्डालाच ठाकरेंचे नाव द्या की, बाळासाहेबांनी केले ठाकरी भाषेत कौतुक

१९९७ मध्ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत पहिल्यांदाच नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर दोन वर्षातच वॉर्डात अनेक विकासकामे केली. त्यांना ठाकरे घराण्यातील व्यक्तींची नावे दिली. ते पाहून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे सुद्धा भारावले. विरोधी बाकावर असतानाही अल्पावधीत केलेली ही कामे पाहून त्यांनी वॉर्डाला आता ठाकरेनगरच असे नाव का देत नाही, अशी ठाकरे शैलीत विचारणा केली.
Memories of Late Balasaheb Thakrey
Memories of Late Balasaheb Thakrey

पिंपरी : १९९७ मध्ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत पहिल्यांदाच नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर दोन वर्षातच  वॉर्डात अनेक विकासकामे केली. त्यांना ठाकरे घराण्यातील व्यक्तींची नावे दिली. ते पाहून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे सुद्धा भारावले. विरोधी बाकावर असतानाही अल्पावधीत केलेली ही कामे पाहून त्यांनी वॉर्डाला आता ठाकरेनगरच असे नाव का देत नाही, अशी ठाकरे शैलीत विचारणा केली. वीस वर्षापूर्वी पाठीवर पडलेली ही कौतुकाची थाप कामाला आणखी प्रेरणा देणारी ठरली. त्यातूनच पुन्हा दोनदा नगरसेवक झाले, अशी आठवण शिवसेनेच्या पुणे जिल्हा (शिरूर) महिला संघटक सुलभा उबाळे यांनी शिवसेनाप्रमुखांच्या सातव्या स्मृतीदिनानिमित्त रविवारी सांगितली.

सौ.उबाळेच नाही,तर त्यांचे पती रामभाऊ हे सुद्धा जुने व सच्चे शिवसैनिक आहेत.बाळासाहेबांच्या निधनानंतर त्यांचा अस्थिकलश राज्यभर नेण्यात आला होता.त्यावेळी पिंपरी-चिंचवडमध्ये तो उबाळे यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आला होता.त्यावेळी शहरवासियांची दर्शनासाठी मोठी रांग लागली होती. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरावर बाळासाहेबांच विशेष लक्ष आणि प्रेम होते. त्यातून ते वरचेवर पुण्यात मुक्कामाला यायचे. १९९९ ला ही ते पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे त्यावेळचे अध्यक्ष अगस्ती कानिटकर यांच्या स्वारगेट येथील समर्थ बंगल्यावर आले होते. 

त्यावेळी सौ. उबाळे या  प्रथमच नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. दोन वर्षे पदाला झाली होती. या कालावधीत त्यांनी आपल्या प्रभागात बाळासाहेबांचे वडिल प्रबोधनकार ठाकरे यांच्या नावाने क्रीडांगण उभारले. प्रबोधनकारांच्या पत्नी रमाबाई यांच्या नावे  वाचनालय सुरु केले. बाळासाहेबांच्या पत्नी मीनाताईंच्या नावे जलतरण तलाव, तर चिरंजीव बिंदूमाधव यांच्या नावे व्यायामशाळा सुरु केली. या कामासह इतर कामाचा अहवाल घेऊन सौ. उबाळे या पुण्यात बाळासाहेबांच्या भेटीसाठी गेल्या होत्या. त्यावेळी अहवाल वाचताना प्रभागात विविध विकासप्रकल्पांना दिलेली आपल्या कुटुंबातील नावे पाहून बाळासाहेबांना आश्चर्य वाटले. 

सत्तेत नसतानाही केलेली विकासकामे पाहून त्यांनी सौ. उबाळेंचे कौतूक केले. प्रभागात एवढी ठाकरेंची नावे दिलीत,आता प्रभागाचेच नामकरण ठाकरेनगर करा,असे आपल्या मिश्कील शैलीत म्हणत त्यांनी कौतुकाची थाप दिली. त्यामुळेच कामाची प्रेरणा मिळून पुढे आणखी दोन वेळा नगरसेवक झाले, असे सौ. उबाळे म्हणाल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com