लता मंगेशकर यांनी कोरोनाच्या लढाईसाठी मुख्यमंत्री निधीत टाकली इतक्या रकमेची भर

राज्यात मुख्यमंत्री निधीसाठी चांगला प्रतिसाद
lata mangeshkar
lata mangeshkar

पुणे : कोरोनाच्या विरोधातील लढाईसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनला मोठा प्रतिसाद मिळाला असून गेल्या दोन दिवसांत त्यात साडेबारा कोटी रुपयांची मदत जमा झाली आहे.

स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनीही या कठिण प्रसंगी मदत करणे हे आपले कर्तव्य आहे, असे म्हणत मी माझ्यातर्फ़े मुख्यमंत्री सहाय्यता निधीला २५ लाख रुपये देत असल्याची घोषणा केली. माझी सर्वांना नम्र विनंती आहे की सरकारच्या क़ोरोना विरोधी लढ्यात आपण सुद्धा सरकारला यथाशक्ति मदत करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी तीन दिवसांचे वेतन (१ कोटी) देण्याचा मोटार वाहन अधिकारी संघटनेने निर्णय घेतला असूव परिवहन मंत्री अनिल परब यांनी  यांनी यासंदर्भातील पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्त केले.
मुख्यमंत्री सहायता निधीच्या स्वतंत्र बँक खात्यात दानशूर व्यक्ती, संस्थांनी योगदान देण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला उत्तम प्रतिसाद मिळाला.  गेल्या दोन दिवसांत १२ कोटी ५० लाख रुपये जमा करणाऱ्या सर्वांचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानले आहेत. या रकमेतून मास्क, व्हेन्टीलेटर, पीपीई किट्स, आरटी-पीसीआर मशीन, मल्टी लोडर रेडिओग्राफी सिस्टिम, मोटराइज्ड बेड्स, फ्रीजर अशी सुमारे १० कोटींची विविध उपकरणे व साहित्य घेणार आहेत.

गोदरेज ग्रुप, जेएम फायनांशियल, मराठा चेंबर ऑफ़ कॉमर्स, सत्व कंसल्टिंग, पल्लवी चोक्सी, एम्एसईडीसीएल, इंडियन मर्चेंट्स चेंबर, बलदेव अरोरा ट्रस्ट, एशियन पेंट्स, हायकेल इंडिया यांनी मोठी मदत केली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com