landge-bandal-meets | Sarkarnama

दोन पैलवान भेटले, चर्चेला उधाण आले

उत्तम कुटे
सोमवार, 4 फेब्रुवारी 2019

खासदारकीची हॅटट्रिक केलेले शिवाजीराव आढळराव पाटील यांना कुठल्याही परिस्थितीत चौकार मारु न देण्यावर सोमवारी भोसरी आणि शिरूरच्या दोन पैलवानांत (महेशदादा लांडगे आणि मंगलदास बांदल) चर्चा झाली. शिरूरमधून तयारीत असलेले बांदल यांनीच याबाबत  सरकारनामाला माहिती दिली.  

पिंपरी: खासदारकीची हॅटट्रिक केलेले शिवाजीराव आढळराव पाटील यांना कुठल्याही परिस्थितीत चौकार मारु न देण्यावर सोमवारी भोसरी आणि शिरूरच्या दोन पैलवानांत (महेशदादा लांडगे आणि मंगलदास बांदल) चर्चा झाली. शिरूरमधून तयारीत असलेले बांदल यांनीच याबाबत  सरकारनामाला माहिती दिली.  

दरम्यान, आढळराव यांना यावेळी चितपट करण्याचा दोन्ही पैलवानांचा डाव हा युती होते की नाही यावर अवलंबून आहे. शिवसेना, भाजपची युती लोकसभेला झाली नाही,तर या दोन पैलवानांची, मात्र ती होईल,असे बांदल यांच्या बोलण्यातून जाणवले.

या परिस्थितीत लांडगे भाजपचे उमेदवार असतील, तर त्यांना सर्वतोपरी मदत करणार असल्याचे बांदल यांनी सांगितले. आढळरावांचा पाडाव हे एकच लक्ष्य असल्याचे ते म्हणाले. 

दुसरीकडे युती झाली, तर भोसरीचे पैलवान निवडणूक आखाड्यात नसतील. आणि बांदल उमेदवार असले,तर आढळराव यांचे कट्टर राजकीय शत्रू असलेल्या भोसरीच्या पैलवानाची आपल्या तालमीतील जोडीदाराला मदत होईल,असा अंदाज आहे. 

कुठल्याही परिस्थितीत लोकसभा लढविणारच आहे, असा पुनरुच्चारही पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे माजी सभापती असलेल्या बांदल यांनी यावेळी केला. 

राष्ट्रवादी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली आहे, ती मिळाली नाही, तरी लढणार आहे, असे बांदल म्हणाले. एकाच तालमीचे वस्ताद असलेले आणि युती झाली नाही, तर शिरूरमधूनच भाजपचे उमेदवार म्हणून नाव घेण्यात येत असलेले भोसरीचे पैलवान आमदार महेशदादा लांडगे यांची आज त्यांनी भोसरीत भेट घेतली. त्या नंतर बोलत होते.

दरम्यान, लोकसभेचे तूर्त प्रतिस्पर्धी असलेल्या या दोन पैलवान मित्रांतील आजची भेट,मात्र चर्चेची ठरली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख