खासदार आढळरावांच्या गावात सेनेचाच झेंडा!

आंबेगाव तालुक्यातील नेत्यांच्या गावांतील ग्रामपंचायत निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष होते. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना त्यांच्या गावात बिनविरोध निवडणूक करण्यास विरोध झाला. त्यामुळे येथे त्यांच्या पॅनेलचा उमेदवार निवडून येणार की नाही, अशी शंका होती.
खासदार आढळरावांच्या गावात सेनेचाच झेंडा!

मंचर : चिंचोडी-लांडेवाडी (ता.आंबेगाव) ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना पुरस्कृत पॅनेलने एकतर्फी विजय संपादन केला आहे. येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पॅनेलचे पानिपत झाले. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या गावातील निवडणूक निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. अंकुश शिवाजी लांडे हे सरपंच पदाच्या निवडणुकीत मोठया फरकाने विजयी झाले आहेत.

येथील निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न ग्रामस्थांनी केला होता. पण त्यामध्ये यश न आल्याने निवडणूक झाली. शिवसेना पॅनेलमधील उमेदवारांच्या प्रचाराची जबाबदारी बाबासाहेब आढळराव पाटील, जानकु पानसरे, तानाजी शेवाळे, शामभाऊ गुंजाळ, सदानंद शेवाळे यांच्यावर सोपविण्यात आली होती. शिवसेनेच्या पॅनेलपुढे राष्ट्रवादी कॉंग्रेसचा कुठेही प्रभाव दिसला नाही. निवडणूक निकालानंतर विजयी उमेदवारांनी गावातील सर्व ग्रामदैवताचे दर्शन घेतले. त्यानंतर सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील झिंदाबादच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. मतदारांचे आभार मानण्यात आले. आढळराव पाटील यांनी दूरध्वनीद्वारे विजयी उमेदवार व गावकऱ्यांचे अभिनंदन केले. 

विजयी उमेदवारांची नावे : सरपंच- अंकुश शिवाजी लांडे, सदस्य - तुकाराम आनंदराव शेवाळे, भास्कर शंकर पाबळे, रूपा गोरक्षनाथ शेवाळे, उत्तम ज्ञानेश्‍वर गुंजाळ, नंदा यशवंत चौरे, आशा बाळासाहेब शेवाळे, मंगल खंडू शेवाळे, सुभाष हरिश्‍चंद्र लांडे, अर्चना गिरीश राजगुरू, स्वाती बाळू विश्‍वासराव, दत्तात्रेय मधुकर तळपे, राजेश अन्सीराम शेवाळे, शांताबाई दत्तू खंडागळे (सर्व शिवसेना) 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com