Lalu will go to Jail Again | Sarkarnama

लालू पुन्हा जेलमध्ये जाणार

वृत्तसंस्था
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

राष्ट्रीय जनता दल पक्षाचे अध्यक्ष व चारा घोटाळ्यातील दोषी लालूप्रसाद यादव यांनी आज (ता. 30) रांची येथील उच्च न्यायालयात शरणागती पत्करली. लालू हे चारा घोटाळ्याप्रकरणी दोषी सिद्ध झाल्यानंतर वैद्यकीय कारणांमुळे पॅरोलवर बाहेर होते.

रांची : राष्ट्रीय जनता दल पक्षाचे अध्यक्ष व चारा घोटाळ्यातील दोषी लालूप्रसाद यादव यांनी आज (ता. 30) रांची येथील उच्च न्यायालयात शरणागती पत्करली. लालू हे चारा घोटाळ्याप्रकरणी दोषी सिद्ध झाल्यानंतर वैद्यकीय कारणांमुळे पॅरोलवर बाहेर होते. त्यांच्या वकिलांनी 3 महिन्याचा जामिन वाढवण्यासाठी झारखंड उच्च न्यायालयात विनंती केली होती, पण त्यांची विनंती फेटाळण्यात आली होती. 

लालू काही दिवसांपासून आजारी आहेत, प्रथम त्यांच्यावर दिल्ली येथे उपचार करण्यात आले, त्यानंतर मुंबईत हृदयरोगाच्या उपचारांसाठी त्यांना दाखल करण्यात आले होते. बुधवारीच (ता. 29) लालु हे रांचीत दाखल झाले होते. जामिन वाढवून न मिळाल्याने आज अखेरीस ते कोर्टात हजर झाले. माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, 'मी उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले आहे. यापुढील निर्णय उच्च न्यायलयाचा आहे, त्याप्रमाणे मी त्याचे पालन करेल.'

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख