आजचा वाढदिवस : लालकृष्ण अडवानी - Lalkrishna Adwani Birthday | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

आजचा वाढदिवस : लालकृष्ण अडवानी

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 8 नोव्हेंबर 2017

लालकृष्ण अडवाणी (जन्म: नोव्हेंबर ८, इ.स. १९२७) - भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते. भारतीय जनसंघाचे माजी अध्यक्ष. भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष. भारताचे माजी उपपंतप्रधान, गृहमंत्री, लोकसभेतील माजी विरोधी पक्षनेते.

लालकृष्ण अडवाणी (जन्म: नोव्हेंबर ८, इ.स. १९२७) - भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांचा जन्म 8 नोव्हेंबर, 1927 रोजी पाकिस्तानातील कराची येथे झाला. फाळणीनंतर अडवानी कुटुंब भारतात आले. 25 फेब्रुवारी 1965 मध्ये त्यांचा विवाह कमला अडवानी यांच्याबरोबर झाला. अडवानी यांचे सुरुवातीचे शिक्षण कराचीतील सेंट पॅट्रीक्स हायस्कूलमध्ये झाले. भारतात परतल्यानंतर मुंबईच्या सरकारी विधी महाविद्यालयातून त्यांनी कायद्याची पदवी मिळवली.

1951 मध्ये डाॅक्टऱ शामाप्रसाद मुखर्जी यांनी जनसंघाची स्थापना केली. तेव्हापासून 1957 पर्यंत अडवानी पक्षाचे सचीव होते. 1972 ते 1977 या काळात ते भारतीय जनसंघाचे अध्यक्ष होते. त्यानंतर 1980 मध्ये भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली. तेव्हापासून 1986 पर्यंत ते भाजपचे सरचिटणीस होते. त्यानंतर 1986 ते 1991 पर्यंत त्यांनी भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. 1974 मध्ये अडवानी राज्यसभेवर निवडून गेले.त्यांना आणीबाणीच्या दरम्यान कारावास घडला. 1977 मध्ये जनसंघ जनता पक्षात विलीन झाल्यानंतर ते जनता पक्षात सामील झाले. आणिबाणीनंतर आलेल्या जनता सरकारमध्ये ते माहिती व प्रसारण मंत्री होते. अडवानी हे चार वेळा राज्यसभेवर तर पाच वेळा लोकसभेवर निवडून गेले. अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या काळात ते देशाचे उपपंतप्रधान होते. देशाचे गृहमंत्री म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. लोहपुरुष म्हणून अडवानी ओळखले जातात.

अडवानी १९८९ आणि १९९१ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. १९९१ च्या निवडणुकींमध्ये त्यांनी गुजरात मधील गांधीनगर लोकसभा मतदारसंघातूनही विजय मिळवला होता. त्यामुळे त्यांनी नवी दिल्ली मतदारसंघाच्या खासदारपदाचा राजीनामा दिला. जैन हवाला प्रकरणात त्यांच्याविरूध्द आरोपपत्र दाखल झाल्यामुळे त्यांनी 1996 ची लोकसभा निवडणुक लढवली नाही. त्यानंतर 1998, 1999, 2004 आणि 2009 च्या निवडणुकांमध्ये गुजरात गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले. 1990 ते 1993 दरम्यान आणि 2004 नंतर ते लोकसभेतील विरोधी पक्षनेते होते.

1990 मध्ये अयोध्येतील राममंदीरासाठी आंदोलन सुरु झाले. त्यावेळी अडवानी यांनी सोमनाथ ते अयोध्या अशी रथयात्रा काढली. त्यामुळे देशभरातचे वातावरण ढवळून निघाले. त्याचा परिणाम म्हणून अयोध्येतली बाबरी मशिद पाडली गेली. बाबरी मशिद पाडण्याच्या प्रकरणात अडवानी यांना आरोपी केले गेले. आजही तो खटला सुरु आहे.

त्यांचे 'माय कंट्री माय लाईफ' हे आत्मचरित्र प्रकाशित झाले आहे. 'ए प्रिझनर्स स्क्रॅप बूक', 'अॅस आय सी ईट' ही पुस्तकेही त्यांनी लिहिली आहेत.

 

 

 

 

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख