पाण्यासाठी सामान्य कुटुंबातील महिला सरपंचाने मिळवली ५ कोटींची योजना

पुणे महामार्गावरील शिंदे गावासाठी आता थेट धारणा नदीमधून पाणी पुरवठा योजना मंजूर झाली आहे. यासाठी येथील महिला सरपंच माधुरी तुंगार यांच्या पाठपुराव्याला यश आले. त्यामुळे गावातील ग्रामस्थांनी अनेक वर्षे रेंगाळलेल्या प्रश्न सुटल्याने पेढे वाटून आनंद साजरा केला. महामार्गावरील ऐतिहासिक शिंदे गावाला आता थेट दारणा नदीमधून जलवाहिनीद्वारे पाणी पुरवठा केला जाणार आहे.
पाण्यासाठी सामान्य कुटुंबातील महिला सरपंचाने मिळवली ५ कोटींची योजना

नाशिक : पुणे महामार्गावरील शिंदे गावासाठी आता थेट धारणा नदीमधून पाणी पुरवठा योजना मंजूर झाली आहे. यासाठी येथील महिला सरपंच माधुरी तुंगार यांच्या पाठपुराव्याला यश आले. त्यामुळे गावातील ग्रामस्थांनी अनेक वर्षे रेंगाळलेल्या प्रश्न सुटल्याने पेढे वाटून आनंद साजरा केला. महामार्गावरील ऐतिहासिक शिंदे गावाला आता थेट दारणा नदीमधून जलवाहिनीद्वारे पाणी पुरवठा केला जाणार आहे.शासनाच्या पाणी पुरवठा विभागाने यासाठी ४  कोटी ९७ लाख ३ हजार रुपये मंजूर केले आहेत. या निर्णयाचे ग्रामपंचायत सदस्यांनी पेढे वाटून स्वागत केले आहे.

ग्रामपंचायतीने राज्याच्या पाणीपुरवठा विभागाला २०१५ मध्ये दारणा नदीमधून शिंदे गावाला  थेट पाणी पुरवठा करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. तत्कालिन पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी सविस्तर प्रस्ताव सादर करण्याची सूचना ग्रामपंचायतीला केली होती. त्याप्रमाणे जिल्हा परिषद मार्फत प्रस्ताव सादर केला. यानंतर पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी ग्रामपंचायत सदस्य यांनी शिंदे गाव ते दारणा नदी पर्यंत सर्व्हे करून अहवाल सादर केला. सर्व शासकीय सोपस्कार पूर्ण केल्यानंतर पाणी पुरवठा योजनेला निधी मंजूर झाला आहे. 

यासाठी सरपंच माधुरी तुंगार आणि उपसरपंच विठाबाई झाडे या सामान्य कुटुंबातील महिलांनी विविध सरकारी कार्यालये, अधिका-यांकडे सततचा पाठपुरावा केला. स्थानिक तसेच नाशिक शहरातील आमदारांनीही त्यांना सहकार्य केले. पुणे मार्गावरील हे गाव राजकीयदृष्ट्या जागरूक आहे. विविध पक्षांच्या नेत्यांवर सरपंचपदासाठी चुरस असते. यंदा सरपंच, उपसरपंच या दोन्ही पदांवर महिला आहेत. त्यांच्या कारकिर्दीत पाणी प्रश्न तुटल्याने तो चर्चेचा विषय ठरला.
 

लवकरच पुढील औपचारिक पूर्तता पूर्ण केली जाणार आहे. शासनाकडे चार वर्षांपासून पाठपुरावा सुरू होता. शिंदे ग्रामस्थांचे स्वप्न पूर्ण होईल -  माधुरी तुंगार , सरपंच शिंदे गाव 

शिंदे गावातील महिलांचा पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लागेल. उन्हाळ्यात पाण्याकरिता करावा लागणारा संघर्ष आता टळणार आहे -  विठाबाई झाडे , उपसरपंच  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com