kusulum sharif dead in london by cancer | Sarkarnama

कुलसूम नवाज शरीफ यांचे लंडनमध्ये निधन 

वृत्तसंस्था
मंगळवार, 11 सप्टेंबर 2018

इस्लामाबादः पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या पत्नी कुलसूम नवाज (वय 68) यांचे लंडनमध्ये उपचार सुरू असताना मंगळवारी निधन झाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयाकडून देण्यात आली. 

2014 पासून घशाच्या कर्करोगाशी झुंज देत असलेल्या कुलसूम यांची प्रकृती सोमवारी रात्रीपासून गंभीर बनली होती. सोमवारी रात्रीपासून कुलसूम यांची फुफ्फुसे व्यवस्थित काम करत नव्हती. त्यांना मंगळवारी "लाइफ सपोर्ट' यंत्रणेवर ठेवण्यात आले होते. मात्र, कर्करोगाशी सुरू असलेली कुलसूम यांची झुंज अखेर संपली, अशी माहिती पाकिस्तानातील माध्यमांनी दिली आहे. 

कर्करोगाशी लढा देत असलेल्या कुलसूम यांच्यावर लंडनमधील हार्ले स्ट्रीट रुग्णालयात उपचार सुरू होते. मंगळवारी त्यांनी रुग्णालयातच अखेरचा श्वास घेतल्याच्या वृत्ताला नवाज यांचे बंधू आणि पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज पक्षाचे अध्यक्ष शाहबाज शरीफ यांनी ट्‌विटद्वारे दुजोरा दिला आहे. 

पाकिस्तानातच कुलसूम यांचा दफनविधी केला जाईल, असा निर्णय शरीफ यांच्या कुटुंबीयांनी घेतला असल्याचे समजते. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी कुलसूम यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. तसेच, कुलसूम यांचे पार्थिव पाकिस्तानात आणण्यासाठी आवश्‍यक ती सर्व मदत सरकारकडून पुरविण्यात येईल, असेही खान यांनी स्पष्ट केले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख