kunjirwadi sarpanch election | Sarkarnama

वडील, भाऊ आणि आता मुलगीही कुंजीरवाडीच्या सरपंचपदी

जनार्दन दांडगे
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

लोणी काळभोर : कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुनिता संदीप धुमाळ यांची तर उपसरपंचपदी गोरख उर्फ रोहिदास राजाराम तुपे यांची गुरुवारी (ता. 13) बिनविरोध निवड झाली. कुंजीरवाडीच्या यापूर्वीच्या सरपंच अनुराधा संतोष कुंजीर व उपसरपंच दत्तात्रेय लक्ष्मण कुंजीर यांनी राजीनामे दिल्याने हे पद रिक्त झाले होते.

मंडल अधिकारी तेजस्विनी साळवेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवडणुकीत, सरपंचपदासाठी सुनिता धुमाळ यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला होता. तर उपसरपंचपदासाठी गोरख उर्फ रोहिदास राजाराम तुपे यांच्यासह विकास परशुराम निगडे, अजय गुलाब गायकवाड व नाना अंकुष कुंजीर या चौघांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.

विकास निगडे, अजय गायकवाड व नाना कुंजीर या तिघांनी आपआपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने, निवडणुक निर्णय अधिकारी तेजस्विनी साळवेकर यांनी सुनिता धुमाळ व गोरख तुपे यांची अनुक्रमे सरपंच व उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली.

सुनिता धुमाळ यांच्यापूर्वी वडील दादासाहेब उर्फ बबनराव तुपे यांनी 89 ते 93 या काळात तर सुनिता धुमाळ यांचे भाऊ सचिन तुपे यांनी 2005 ते 09 या काळात सरपंचपद भषविले आहे. एकाच घरात सरपंचपद भुषविणारे वडील, भाऊ व मुलगी असा त्रिवेणी संगम मिळुन आला आहे. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख