कुमारस्वामींच्या शपथविधिला उद्या हेवीवेट नेते येणार 

कुमारस्वामींच्या शपथविधिला उद्या हेवीवेट नेते येणार 

नवी दिल्ली : कर्नाटकाचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी आणि पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांची काल नवी दिल्लीत भेट घेतली. यावेळी त्यांना शपथविधी समारंभाला येण्याचे निमंत्रण दिले. मुख्यमंत्री आज अन्य पक्षांच्या नेत्यांच्याही भेटीघेणार असल्याचे समजते. 

शपथविधि समारंभानिमित्त दोन्ही पक्ष शक्तीप्रदर्शन करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.त्यांनी यापूर्वीच पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनाही निमंत्रण दिले आहे.त्यांच्या शपथविधिला कोण कोण जाणार याकडे देशाचे लक्ष आहे.

<blockquote class="twitter-tweet" data-lang="en"><p lang="en" dir="ltr">I had a warm and cordial meeting this evening, in Delhi, with Shri H D Kumaraswamy ji. We discussed the political situation in Karnataka and other matters of mutual interest. I will be attending his swearing in as CM of Karnataka, on Wednesday, in Bengaluru. <a href="https://t.co/sZAwX8mQut">pic.twitter.com/sZAwX8mQut</a></p>&mdash; Rahul Gandhi (@RahulGandhi) <a href="https://twitter.com/RahulGandhi/status/998573614508249089?ref_src=twsrc%5Etfw">May 21, 2018</a></blockquote>
<script async src="https://platform.twitter.com/widgets.js" charset="utf-8"></script>
 

येडियुरप्पा बहुमत सिद्ध करू न शकल्याने राज्यपालांनी कुमारस्वामींना सरकार स्थापनेचे निमंत्रण दिले आहे. कॉंग्रेस आणि जेडीयू या पक्षाचे सरकार तेथे सत्तेवर आले आहे. राहुल गांधीबरोबर कुमारस्वामींनी मंत्रिमंडळ स्थापनेबाबत चर्चा केल्याचे समजते. कर्नाटकाच कॉंग्रेस आणि जेडीयू स्थिर सरकार देईल असा विश्वास त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. खातेवाटपाचा निर्णय तातडीने घेण्यात येणार असून खातेवाटपावरून आमच्यात कोणतेही मतभेद नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. 

दरम्यान, कुमारस्वामी हे मुख्यमंत्री आहेत. उपमुख्यमंत्री एक असतील की दोन तसेच तो लिंगायत समाजाचा असेल का याबाबतही उत्सुकता ताणली गेली आहे. लिंगायत समाजाला खूश ठेवण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत लिंगायत समाजाच्या नेत्याकडे दोन नंबरचे पद देण्यात येणार असल्याचीही चर्चा आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com