कुमारस्वामींच्या अशा आहेत गृहमंत्री ! 

कुमारस्वामींना 2006 हे टर्निंग पॉइंट ठरले. प्रसिद्ध कन्नड अभिनेत्री राधिका यांनी त्यांच्या जीवनात प्रवेश केला. सौंदर्यवती अभिनेत्री, निर्मात्या असलेल्या राधिका कुमारस्वामींच्या पत्नी आणि माजी पंतप्रधान देवेगौडांच्या स्नुषा बनल्या. आज त्या मुख्यमंत्र्याच्या गृहमंत्री आहे.
 कुमारस्वामींच्या अशा आहेत गृहमंत्री ! 

बॉलिवूड आणि राजकारण या दोन क्षेत्रातील स्टार आणि स्टार कॅम्पनेरविषयी नेहमीच गॉसिप केले जाते. नेत्यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल किंवा त्यांच्या कुटुंबीयांविषयीची माहिती जाणून घेण्याची उत्सुकता जनतेला असते.

माजी पंतप्रधान देवेगौडा यांचे पुत्र आणि कर्नाटकाचे नवे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच त्यांच्या पत्नी आणि मुलीचा फोटो सोशल मीडियावर झळकला आणि लाईकबरोबर शुभेच्छांचा धो धो पाऊसच पडला. 

कोण आहेत राधिका ? 
राधिका कर्नाटकातील प्रसिद्ध अभिनेत्री. आज त्या मुख्यमंत्र्याच्या पत्नी आहेत. इतकेच लोकांना माहीत असले तरी प्रत्येकाच्या जीवनात आनंदाबरोबरच कधी तरी संकट घोंघावत येते. राधिका यांच्याबाबतही असेच झाले. 

राधिका यांचा यांचा जन्म 1 नोव्हेंबर 1986 रोजी झाला. राधिकांचा पहिला विवाह रतनकुमार यांच्याबरोबर 2000 मध्ये झाला. त्यावेळी त्या फक्त चौदा वर्षाच्या होत्या. खरेतर हा बालविवाहच. या लग्नाला त्यांच्या आईवडिलांचा कडाडून विरोध होता. राधिकांच्या वडिलांनी रतन यांच्याविरोधात पोलिसांकडे तक्रारही केली होती. माझ्या मुलीचे अपहरण करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले होते. या सर्व नाट्याला त्यांना सामोरे जावे लागले. पण, रतनकुमार यांच्यावर जिवापाड प्रेम होते. 

2002 मध्ये रतनकुमार यांचा हार्टऍटकने मृत्यू झाला. ज्यांचे नाव हृदयाच्या एका कोपऱ्यात जपून ठेवले होते. त्यानेच अचानक एक्‍झिट घेतली होती. खूप मोठा धक्का होता. त्या धक्‍क्‍यातून कशातरी त्या सावरल्या. 


पतीच्या निधनानंतर त्यांनी पुन्हा आपले लक्ष चित्रपटाकडे केंद्रित केले. पुढे एका कार्यक्रमात कुमारस्वामींची आणि त्यांची भेट झाली. या भेटीनंतर मैत्री आणि मैत्रीचे रूपांतर विवाहात झाले. 2006 मध्ये कुमारस्वामीनी राधिका यांच्याबरोबर विवाह केला. ते ही पहिली पत्नी असताना. राधिका या कुमारस्वामींपेक्षा 26 वर्षांनी लहान आहेत. ज्यावर्षी कुमारस्वामींचा पहिला विवाह झाला होता त्याच वर्षी राधिकांचा जन्म झाला होता. 

कुमारस्वामीनी पहिल्या पत्नीला घटस्फोट दिलेला नाही. कुमारस्वामींना निवडून आणण्यासाठी या दोघींनी प्रचार केला. पहिल्या पत्नीकडे प्रचाराची जवळजवळ सर्व सूत्रे होती. त्यांचा दोन्ही पत्नीबरोबर सुखाने संसार सुरू आहे. त्यांना दुसऱ्या पत्नीपासून एक मुलगी आहे. तिचे नाव आहे शमिका. 

कन्नड आणि तमीळ भाषेतही राधिका यांनी काम केले आहे. त्यांचा पहिला चित्रपट होता निनागागी. त्यांच्या नावावर 36 चित्रपटांची नोंद आहे. आज चित्रपट निर्मात्या आहेत आणि हेवीवेट नेत्याच्या गृहमंत्रीही. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com