कुमारस्वामींच्या कणखर लो-प्रोफाईल अर्धांगिंनी 

कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी हे एक यशस्वी राजकारणी म्हणून ओळखले जातात. राजकारणात त्यांची चढती कमान असली तरी त्यांच्या यशामध्ये पत्नी अनिता कुमारस्वामी यांचा सिंहाचा वाटा आहे.
कुमारस्वामींच्या कणखर लो-प्रोफाईल अर्धांगिंनी 

कुमारस्वामी हे माजी पंतप्रधानांचे पुत्र ही त्यांची ओळख असली तरी राज्यातील राजकारणात म्हणजेच बलाढ्य अशा कॉंग्रेस आणि भाजपशी टक्कर देणेही सोपे नव्हते. मात्र पत्नी अनिता यांनी प्रचंड मेहनत घेताना रात्रीचादिवस एक केला. पतींनी घेतलेल्या प्रत्येक निर्णयाला विरोध न करता त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. मग लोकसभा, विधानसभेची निवडणूक असेल किंवा वैयक्तिक जीवनात अगदी धक्का देणारा निर्णय असेल. 

अनिता (वय 54) या कुमारस्वामींच्या डिझायर्नर आहेत. त्याही राजकारणात पतीप्रमाणे सक्रीय आहेत. यापूर्वी त्या आमदारही होत्या.यावेळी त्या पुन्हा आमदार म्हणून मुख्यमंत्री पतीबरोबर सभागृहात दिसण्याची शक्‍यता आहे. 2018 च्या निवडणुकीत कुमारस्वामी हे रामनगर आणि चणणपटाना या दोन विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहे.

मुख्यमंत्री होताच त्यांनी चणपट्टणाचा राजीनामा दिला आहे. आता येथून पहिल्या पत्नी अनिता यांना रिंगणात उतरविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. काही दिवसात पोटनिवडणुक लागल्यास त्या उमेदवार असतील हे जवळजवळ निश्‍चित झाले आहे. 

अनितांनी राजकारणात पाऊल ठेवले ते 1996 मध्ये. कुमारस्वामी कनकपुरातून निवडणूक लढवित होते. पतींच्या विजयाची जबाबदारी अर्थात अनितांच्या खांद्यावर येऊन ठेपली होती. त्यावेळी त्यांचा मुलगा सहा वर्षाचा होता. मुलाला आईकडे ठेवून त्या सकाळीच प्रचारासाठी बाहेर पडत असंत.एका गावातून दुसऱ्या गावचा प्रवासतर दररोजचाच होता. तहानभूम विसरून त्या खऱ्या अर्थाने मैदानात होत्या. त्यावेळी कुमारस्वामी निवडून आले खरे. पण, विजय मात्र पत्नी अनितांचा झाला होता हे सांगायला नकोच. 

आता बारा वर्षांनी त्या पुन्हा खऱ्या अर्थाने राजकारणाच्या फडात उतरतील असे दिसते.गेल्या बारा वर्षात कर्नाटकात ज्या म्हणऊन निवडणुका झाल्या त्यामध्ये त्या पक्षासाठी काम करीत आल्या. कालच्या निवडणुकीत त्या कुमारस्वामींसाठी दोन्ही मतदारसंघात प्रचार करीत होत्या. दोन्ही मतदारसंघ त्यांनी जवळजवळ पालथे घातले. कुमारस्वामींचे या मतदारसंघाकडे लक्षही नव्हेत. ते राज्यभर पायाला भिंगरी लावून फिरत होते. इतके होऊनही पक्षाला कमी जागा मिळाल्याचे दु:ख अनितांना वाटते. 

2008 मध्ये त्या मधुगिरी मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. त्या आमदार झाल्या खऱ्या पण, सभागृहात लोप्रोफाईल आमदार म्हणूनच त्यांची ओळख होती. 2013 मध्ये त्यांनी चण्णपटणमधून विधानसभेची निवडणूक लढविली पण, कॉंग्रेसच्या उमेदवारांने त्यांचा पराभव केला. म्हणजे यश आणि अपयश पचविण्याची दाखत त्यांच्यात आहे. कुमारस्वामी पुन्हा मुख्यमंत्री बनले ते पत्नी अनितांच्या भक्कम पाठिंब्यामुळेच हे नाकारून चालणार नाही. 

त्यांना यावेळी चण्णपटनमधून निवडणूक लढवायची होती.पण, कुमारस्वामी आणि सासरे देवेगौडा यांनी त्यांना तिकीट दिले नाही. एकाच घरातील दोन व्यक्तिनी निवडणूक लढवायची नाही असा निर्णय घेतला. अनितांनी या निर्णयाला पाठिंबा देत दोन्ही मतदारसंघाची जबाबदारी घेतली. कुमारस्वामी दोन्हीकडून विजयी झाले. आता ज्या मतदारसंघातून लढायचे होते त्याच आवडीच्या मतदारसंघाच्या मैदानात त्या उतरणार असल्याचे समजते. पती मुख्यमंत्री आणि पत्नी आमदार असे चित्र लवकरच सभागृहात पाहण्यास मिळू शकते. 

कुमारस्वामी-अनिता यांना निखिलकुमार हा मुलगा आहे. तो कन्नड अभिनेता आहे. एक चित्रपट निर्माती, राजकारणी, उद्योजक असा अनितांचा प्रवास आहे. कुमारस्वामींच्या अशा आहेत पहिल्या लोप्राफाईल पत्नी ! 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com