kumarswami celebrates his son wedding aviods social distancing also | Sarkarnama

कुमारस्वामी यांच्या मुलाचे धुमधडाक्यात लग्न, सोशल डिस्टन्सिंगची ऐशी-तैैशी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 17 एप्रिल 2020

चीनी व्हायरसच्या संकटामुळे देश लॉकडाऊनमध्ये असताना कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या मुलाचे लग्न धुमधडाक्यात पार पडले. बंगळुरु रेड झोनमध्ये  असल्याने ग्रिन झोनमधील रामनगर येथील फार्महाऊसवर लग्न केल्याचे कुमारस्वामी यांनी सांगितले आहे. मात्र, याठिकाणी सोशल डिस्टन्सिंग पाळले नाही आणि रेड झोनमधून ग्रीन झोन असलेल्या भागात येण्याची परवानगी कशी मिळाली, असा प्रश्न विचारला जात आहे.  या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश कर्नाटकचे उपमुख्यमंत्री सी. एन. अश्वथनारायण यांनी दिले आहेत.

 

बंगळुर : चीनी व्हायरसच्या संकटामुळे देश लॉकडाऊनमध्ये असताना कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या मुलाचे लग्न धुमधडाक्यात पार पडले. बंगळुरु रेड झोनमध्ये  असल्याने ग्रिन झोनमधील रामनगर येथील फार्महाऊसवर लग्न केल्याचे कुमारस्वामी यांनी सांगितले आहे. मात्र, याठिकाणी सोशल डिस्टन्सिंग पाळले नाही आणि रेड झोनमधून ग्रीन झोन असलेल्या भागात येण्याची परवानगी कशी मिळाली, असा प्रश्न विचारला जात आहे.  या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश कर्नाटकचे उपमुख्यमंत्री सी. एन. अश्वथनारायण यांनी दिले आहेत.

   
माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा  यांचे नातू आणि जनता दलाचे नेते एच. डी. कुमारस्वामी यांचे पुत्र निखिल कुमारस्वामी यांचा विवाह सोहळा पार पडला.  देशभरात लॉकडाउन सुरू असताना या विवाहाला रितसर परवानगी घेण्यात आली असली तरी, लग्न समारंभात सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले नसल्याचा आरोप होत आहे.

निखील कुमारस्वामी यांचे काँग्रेसचे माजी मंत्री एम. कृष्णप्पा यांची भाची रेवती हिच्याशी बेंगळरूतील कुमारस्वामी यांच्या निवासस्थानी आज सकाळी विवाह पार पडला. कालपासूनच येथे लग्न सोहळ्याचे कार्यक्रम सुरू झाले होते.

निखिल हा अभिनेता असून शुक्रवारी ( 17 एप्रिल) मुहूर्तावर निखिलचं लग्न रेवतीसोबत करण्याचं आधीपासूनच ठरलं होतं.आम्हाला धुमधडाक्यात लग्न करायचं होते, तुम्हा सर्वांना आमंत्रण द्यायचं होतं. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्यामुळे आम्हाला ठरलेल्या दिवशीच छोटेखानी विवाह सोहळा आखणे भाग आहे, असं म्हणत कुमारस्वामी यांनी पाहुण्यांची माफी मागितली. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना, नातेवाईकांना आणि हितचिंतकांना विवाहस्थळी भेट न देण्याचे आवाहन केले. घरुनच वधू-वरांना आशीर्वाद देण्याचं आवाहन कुमारस्वामी यांनी केल. बंगळुरु हे ाा रेड झोनमध्ये येत असल्यामुळे रामनगरह्ण या ग्रीन झोन शहरातल्या फार्म हाऊसवर लग्न पार पडलं. 12-13 डॉक्टरांसोबत बोलून लग्नसोहळा आयोजित केल्याचं कुमारस्वामी म्हणाले आहेत. मात्र, लग्नाच्या फोटोमध्येच सोशल डिस्टन्सिंगचे तीन-तेरा वाजल्याचे चित्र दिसत आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख