कर्नाटकचे माजी मु्खयमंत्री एच. डी. कुमारस्वामी अडचणीत

माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी, नातेवाईक सावित्रामा आणि आमदार डी. सी. तम्मण्णा यांनी रामनगर जिल्ह्यातील केतगनहळ्ळीच्या वेगवेगळ्या सर्व्हे क्रमांकातील 54 एकर शेतीचा अनधिकृतपणे वापर केला आहे. वापरली जात असलेली जमीन बंगळूर-म्हैसूर महामार्गावर आहे. याचिकाकर्त्याने तक्रारीत म्हटले आहे की, जमिनीचा बाजारभाव प्रति एकर अंदाजे 75 लाख ते 1 कोटी रुपये आहे. परिणामी सरकारला कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
कर्नाटकचे माजी मु्खयमंत्री एच. डी. कुमारस्वामी अडचणीत

बंगळूर : माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी व त्यांचे नातेवाईक सावित्रीम्मा व माजी मंत्री डी. सी. तम्मण्णा यांनी सरकारी जमीन अनधिकृतपणे बळकावल्याप्रकरणी लोकायुक्तांनी 2014 मध्ये जारी केलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची ग्वाही राज्य सरकारने उच्च न्यायालयाला दिली. 
यासंबंधी समाज परिवर्तनचे संस्थापक अध्यक्ष एस. आर. हिरेमठ यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेची सुनावणी मंगळवारी सरन्यायाधीश ए. एस. ओक व न्यायमूर्ती हेमंत चंदनगौडर यांच्या विभागीय खंडपीठासमोर झाली. 
लोकायुक्तांनी 5 ऑगस्ट 2014 रोजी जारी केलेल्या आदेशाची अंमलबजावणी तीन महिन्यांत होईल, असे मत राज्याचे अतिरिक्त महाधिवक्ता ध्यान चिन्नप्पा यांनी सुनावणीच्या वेळी मांडले. हे निवेदन नोंदवून न्यायपीठाने याचिका निकाली काढली. माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी, नातेवाईक सावित्रामा आणि आमदार डी. सी. तम्मण्णा यांनी रामनगर जिल्ह्यातील केतगनहळ्ळीच्या वेगवेगळ्या सर्व्हे क्रमांकातील 54 एकर शेतीचा अनधिकृतपणे वापर केला आहे. वापरली जात असलेली जमीन बंगळूर-म्हैसूर महामार्गावर आहे. याचिकाकर्त्याने तक्रारीत म्हटले आहे की, जमिनीचा बाजारभाव प्रति एकर अंदाजे 75 लाख ते 1 कोटी रुपये आहे. परिणामी सरकारला कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com