kumar vishawas | Sarkarnama

"केजरीवालांवर कुमार विश्वासांचा हल्लाबोल'

वृत्तसंस्था
रविवार, 16 एप्रिल 2017

नवी दिल्ली : ज्या भ्रष्टाचाराच्या मुद्यावर आम आदमी पक्षाचे सरकार दिल्लीत सत्तेवर आले त्याच सरकारचा कारभार कसा चालला आहे. जर आपल्याच सरकारवर लोक भ्रष्टाचाराचे आरोप करू लागले तर त्यांना काय उत्तर द्यायचे असा सवाल करून "आप'चे ज्येष्ठ नेते कुमार विश्वास यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि दिल्ली सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. ही टीका मात्र केजरीवाल यांचे नाव न घेता केली आहे. त्यामुळे पक्षातील वाद पुन्हा एकदा उफाळून येण्याची शक्‍यता आहे. 

नवी दिल्ली : ज्या भ्रष्टाचाराच्या मुद्यावर आम आदमी पक्षाचे सरकार दिल्लीत सत्तेवर आले त्याच सरकारचा कारभार कसा चालला आहे. जर आपल्याच सरकारवर लोक भ्रष्टाचाराचे आरोप करू लागले तर त्यांना काय उत्तर द्यायचे असा सवाल करून "आप'चे ज्येष्ठ नेते कुमार विश्वास यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि दिल्ली सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. ही टीका मात्र केजरीवाल यांचे नाव न घेता केली आहे. त्यामुळे पक्षातील वाद पुन्हा एकदा उफाळून येण्याची शक्‍यता आहे. 
"आप'च्या संस्थापक सदस्यापैंकी विश्वास एक आहेत. दिल्लीत "आप'चे सरकार सत्तेवर आल्याने लोकांच्या आशाआकांक्षा पूर्ण केल्या जातील. दिलेल्या आश्‍वासनांची पूर्ती केली जाईल असे पक्षातील अनेक नेत्यांना वाटत होते. पण, दिलेली आश्‍वासने पूर्ण न केल्याने पक्षातच तीव्र नाराजी आहे. कुमार विश्वास हे तर भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. 
विश्वास यांचा तेरा मिनिटांच्या भाषणाचा एक व्हिडिओ त्यांनी "ट्विट' केला आहे. त्यांनी या भाषणात केजरीवाल यांना लक्ष केले आहे. पण त्यांचे नाव न घेता अनेक मुद्याकडे लक्ष वेधले आहे. काश्‍मीर ते पाकिस्तानपर्यंत देशात ज्या चर्चा आणि राजकारण सुरू आहे त्याविषयी विश्वास यांनी मनोगत व्यक्त केले आहे. तेरा मिनिटात ते सर्वाधिक "आप'ल्यावर बोलले आहेत. 
"हम भारत के लोगो' अशी सुरवात करून विश्वास म्हणतात,"" भ्रष्टाचारमुक्त सरकार देण्याचे आश्‍वासन दिल्लीकरांना देऊन आपले सरकार सत्तेवर आले. भ्रष्टाचाराचा लोकांना कोणताही त्रास होणार असे आश्‍वासन आम्हीच दिले होते. मात्र प्रशासनात सुरू असलेल्या भ्रष्टाचारावर जर लोक प्रश्‍न करू लागले तर काय उत्तर द्यायचे?'' 
नेत्यांच्या उदोउदोपणावर जोरदार हल्ला चढविताना विश्वास म्हणाले, "" सध्या देशात व्यक्तिपूजेचे राजकारण सुरू आहे ते किळसवाणे आहे. नेत्यांच्या भक्तांची संख्या वाढत आहे. हे भक्त नेत्यांना खूष ठेवण्यासाठी घोषणा देत आहेत. ""मोदी.. मोदी..., अरविंद... अरविंद... राहुल... राहुल...'' हेच चेहरे आपणासमोर पद्धतशीरपणे आणले जात आहे. एकेकाळी "इंडिया इज इंदिरा, इंदिरा इज इंडिया' अशा घोषणा देण्यात आल्या आता तशाच घोषणा देण्याचे काम पद्धतशीरपणे सुरू आहे. "मोदी राज आ गया, योगी राज आ गया... ए. के. राज आ गया.' या नेत्यांची सत्ता असली तरी ती अल्पकाळासाठीच आहे. ते काही दहा, वीस किंवा पंचवीस वर्षे सत्तेवर राहणार नाहीत याचाही या नेत्यांनी विचार करायला हवा. या नेत्यांच्या पलीकडे देश आहे हे लक्षात घेण्याची गरजही आहे. देशात, राज्यात जे सत्तेवर आहेत. ती सत्ता कायमसाठी त्यांच्यासाठी नाही. सत्ता येते आणि जाते. आज जे राजमहालात आहेत त्यांना एक दिवस बाहेर पडून पुन्हा आपल्या घरट्यात परतावे लागेल याची जाणीव सत्तेत असलेल्या नेत्यांनी ठेवायला हवी.''  
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख