kuldeep aambekar appointment on youth wing | Sarkarnama

'लोजद' युवा आघाडी प्रदेशाध्यक्षपदी आंबेकर 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 7 सप्टेंबर 2019

ते पुण्यात विद्यार्थी चळवळीत सक्रिय आहेत.

पुणे : शरद यादवप्रणित लोकतांत्रिक जनता दलाच्या युवा आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी कुलदीप आंबेकर यांची निवड करण्यात आली आहे.

कुलदीप आंबेकर हे मूळचे उस्मानाबाद जिल्ह्यातील आहेत. ते पुण्यात विद्यार्थी चळवळीत सक्रिय आहेत. पुणे विद्यापीठात त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर अनेक आंदोलने केली आहेत.  ग्रामीण भागातून पुण्यात शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत मेसची सुविधा देण्याचा उपक्रम एक वर्षांपासून राबवला आहे. लोकतांत्रिक जनता दलाच्या महासचिव सुशिला मोराळे, युवा अध्यक्ष सलीम मुद्दावार यांनी आंबेकर यांना नियुक्ती पञ दिले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख