कुलाबा  : पुरोहितांचा पत्ता कट आता स्पर्धा नार्वेकर बंधूंमध्ये !

ऍड.राहूल नार्वेकर यांना तिकीट द्यावे का विद्यमान नगरसेवक त्यांचे बंधू ऍड.मकरंद नार्वेकर यांना द्यावे यावरुन खलबतं सुरु असून शेवटी नगरसेवकाला संधी मिळण्याची शक्‍यता आहे.
Purohit-Vs-Narwekar
Purohit-Vs-Narwekar

मुंबई :कुलाबा येथील भाजपचे विद्यामान आमदार राज पुरोहित यांचे तिकीट कापणार असल्याची कुणकुण लागताच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्या समोर तिव्र नाराजी व्यक्त केली.


बाहेरुन आलेल्यां विरोधात ही पहिली थेट नाराजी असल्याने आता भाजपही पेचात अडकली आहे.त्यामुळे कुलाबा मधून ऍड.राहूल नार्वेकर यांना तिकीट द्यावे का विद्यमान नगरसेवक त्यांचे बंधू ऍड.मकरंद नार्वेकर यांना द्यावे यावरुन खलबतं सुरु असून शेवटी नगरसेवकाला संधी मिळण्याची शक्‍यता आहे.


राहूल नार्वेकर हे फलटण येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते रामराजे निंबाळकर यांचे जावई आहेत.त्यामुळे कुलाबा येथून त्यांना उमेदवारी मिळवण्यासाठी निंबाळकर यांनी शब्द टाकला होता.त्यातच राज पुरोहित यांच्या बद्दल दिल्ली पासून नाराजी असल्याने त्यांना पर्याय म्हणून राहूल नार्वेकर यांचे नाव पुढे करण्यात आले.


याची कुणकुण लागताच राज पुरोहित यांनी मुख्यमंत्री आणि लोढा यांच्या समोरच तिव्र नाराजी व्यक्त केली.राहूल नार्वेकर यांचा प्रवास शिवसेना,राष्ट्रवादी कॉंग्रेस असा झाला आहे. 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये प्रवेश केला. मावळ मधून निवडणुन लढवली.तेथे पराभव झाल्यानंतर त्यांना विधानपरीषदेवरही घेण्यात आले.त्यांचा हा राजकीय प्रवास वादाचा ठरु शकतो.


त्यामुळे आयत्या वेळी त्यांचे बंधू ऍड.मकरंद नार्वेकर यांचे नाव पुढे आणण्यात आले असल्याचे समजते.मकरंद नार्वेकर हे कुलाबा येथील नगरसेवक असून त्यांची स्थानिकांमध्ये चांगली पकड आहे.तसेच,उच्चभ्रु वर्गातही त्यांची उठबस असल्याने पारंपारीक मतदारां बरोबरच हे मतदारही भाजपला पाठींबा देऊ शकतील अशी शक्‍यता आहे. 


तसेच दोन पक्षांचा प्रवास करुन आलेल्या व्यक्तीला उमेदवारी देण्यावरुन इतर ठिकाणे कार्यकर्तेही नाराज होऊ शकतात.त्यामुळे राहूल नार्वेकर यांच्या बरोबर मकरंद नार्वेकर यांचेही नाव आता पुढे आले आहे.


या सर्व स्पर्धेत भाजपचे भुमिपुत्र राज पुरोहित मागे पडले आहे.त्यांचे तिकीट कापलेच असल्याची शक्‍यता आहे.
पुरोहित यांनी पुर्वी केंद्र सरकारच्या अनेक निर्णयावर थेट नाराजी व्यक्त केली आहे.त्यामुळे त्यांना आता तिकीट नाकारल्यास ते गप्प बसणाऱ्यां पैकी नाहीत .

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com