`बेरजेच्या राजकारणामुळे कुल यांचा विजय निश्चित`

`बेरजेच्या राजकारणामुळे कुल यांचा विजय निश्चित`

केडगाव  : "महायुतीचे उमेदवार आमदार राहुल कुल हे काळाबरोबर चालणारे नेतृत्व असून त्यांनी केलेले बेरजेचे राजकारण त्यांना मोठे मताधिक्‍य देईल,'' असा दावा दौंडचे माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया यांनी व्यक्त केला.

आमदार कुल यांनी मुळशीचे पाणी, एमआयडीसी, लोकल, प्रांत कार्यालय, क्रीडा संकुल, कुरकुंभ मोरी, नाट्यगृह, रुग्णांना मदत, दौंडमधील पाणीपुरवठा व रस्ते, बेबी कालवा या कामांचा अभ्यासपूर्ण पाठपुरावा केला. ही कामे जनतेला भावली आहेत. त्यातूनच राष्ट्रवादीतील काही पदाधिकाऱ्यांनी पक्षाला रामराम केला. यामुळे महायुतीच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे. निवडून आल्यानंतर काय करणार, याचे ठोस उत्तर माजी आमदार रमेश थोरात यांच्याकडे नाही. वरवंड येथील थोरात यांच्या प्रचारसभेत कुल कुटुंबावर खालच्या पातळीत टीका करण्यात आली. त्यामुळे तालुक्‍यात कुल यांच्याबाबत सहानुभूती वाढली आहे, असे कटारिया यांनी नमूद केले.

आमदार कुल म्हणाले, ""थोरात हे पारदर्शी कारभाराचा टेंभा मिरवतात. मात्र, दौंड बाजार समितीची यवत येथील दहा एकर जागा विकायला का काढली? बाजार समितीचे गुळाचे सेस गोळा करण्याचे लिलाव का बंद आहेत? त्यांच्या शाळांमधील शिपायाकडूनसुद्धा निवडणूक निधी का घेतला, खरेदी-विक्री संघाचा नफा अडीच लाख का, धनगर आरक्षणावर विधानसभेत एकदातरी बोलले का, कंपन्यांतील त्यांच्या मुलाची ठेकेदारी याची उत्तरे त्यांनी दिली पाहिजेत.''

सरकार भाजपचेच येणार : होळकर
अहल्यादेवींचे वंशज भूषणसिंह होळकर यांनी आज दौंड तालुक्‍यात धनगरबहुल गावांत बैठका घेतल्या. देश व राज्यात भाजपचे सरकार येणार असून कुल मंत्री होणार असल्याने दौंडची जबाबदारी वाढली आहे, असे त्यांनी नमूद केले. माजी आमदार रंजना कुल, आनंद थोरात, मल्हारी गडधे, दादा केसकर, बाळासाहेब तोंडे पाटील, दत्तू डुबे उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com