आजचा वाढदिवस : जयदत्त क्षीरसागर, आमदार, प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस, - kshirsagar jaydatta for beed | Politics Marathi News - Sarkarnama

आजचा वाढदिवस : जयदत्त क्षीरसागर, आमदार, प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस,

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

दिवंगत नेत्या व माजी खासदार केशरबाई क्षीरसागर यांचे ज्येष्ठ चिरंजीव आणि सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे विधिमंडळातील उपनेते आणि पक्षाच्या राज्य कार्यकारिणीचे उपाध्यक्ष असलेले आमदार जयदत्त क्षीरसागर हे राष्ट्रवादीतील ओबीसी नेते म्हणून ओळखले जातात. युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून राजकीय फडात उतरलेल्या जयदत्त क्षीरसागर यांनी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, उपमंत्री, राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री असा प्रवास केला. चौथ्या वेळी आमदार असलेले जयदत्त क्षीरसागर पक्षाकडून मागच्या विधानसभा निवडणुकीत विजयी झालेले जिल्ह्यातील एकमेव उमेदवार आहेत.

दिवंगत नेत्या व माजी खासदार केशरबाई क्षीरसागर यांचे ज्येष्ठ चिरंजीव आणि सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे विधिमंडळातील उपनेते आणि पक्षाच्या राज्य कार्यकारिणीचे उपाध्यक्ष असलेले आमदार जयदत्त क्षीरसागर हे राष्ट्रवादीतील ओबीसी नेते म्हणून ओळखले जातात. युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून राजकीय फडात उतरलेल्या जयदत्त क्षीरसागर यांनी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, उपमंत्री, राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री असा प्रवास केला. चौथ्या वेळी आमदार असलेले जयदत्त क्षीरसागर पक्षाकडून मागच्या विधानसभा निवडणुकीत विजयी झालेले जिल्ह्यातील एकमेव उमेदवार आहेत. भूविकास बॅंकेचे अध्यक्ष, जिल्हा बॅंकेचे संचालक, राज्य मार्केटिंग फेडरेशनचे संचालक, जिल्हा खो - खो असोसिएशनचे अध्यक्ष यासह ते गजानन सहकारी सूतगिरणी, गजानन सहकारी बॅंकेचेही अध्यक्ष आहेत. अनंत कृषी प्रतिष्ठान, विनायक युवक प्रतिष्ठान तसेच आदर्श व नवगण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी जिल्हाभरात शिक्षण संस्थांचे जाळे उभारले आहे. अखिल भारतीय तौलिक महासभेचे ते अध्यक्ष आहेत. क्षीरसागर ऊर्जा मंत्री असतानाच शेतकऱ्यांना वीज बिल माफीचा निर्णय झाला होता. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख