आजचा वाढदिवस : आमदार कृष्णा खोपडे, भाजप नागपूर पूर्व - krushana khopade, nagpur bjp | Politics Marathi News - Sarkarnama

आजचा वाढदिवस : आमदार कृष्णा खोपडे, भाजप नागपूर पूर्व

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 6 मार्च 2018

कॉंग्रेसमधून राजकीय कारकीर्द सुरू करणाऱ्या कृष्णा खोपडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मागे वळून बघितले नाही. भाजपमध्ये नगरसेवक, उपमहापौर, आमदार अशी पदे त्यांना मिळाली. पूर्व नागपूरमध्ये भाजपचे संघटन वाढविण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. यामुळे त्यांची नागपूर शहर भाजपच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. 2009 मध्ये माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांचा पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघात त्यांनी पराभव केला होता. त्यानंतर चतुर्वेदी यांच्या राजकीय कारकिर्दीला ग्रहण लागले.

कॉंग्रेसमधून राजकीय कारकीर्द सुरू करणाऱ्या कृष्णा खोपडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मागे वळून बघितले नाही. भाजपमध्ये नगरसेवक, उपमहापौर, आमदार अशी पदे त्यांना मिळाली. पूर्व नागपूरमध्ये भाजपचे संघटन वाढविण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. यामुळे त्यांची नागपूर शहर भाजपच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. 2009 मध्ये माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांचा पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघात त्यांनी पराभव केला होता. त्यानंतर चतुर्वेदी यांच्या राजकीय कारकिर्दीला ग्रहण लागले. 2014 मध्येही त्यांनी भाजपची जागा कायम राखली एवढेच नव्हे तर नागपूर महापालिकेत पूर्व नागपूरमधून सर्वाधिक नगरसेवक निवडून आणून पक्ष मजबूत केला. नागपूर शहराच्या राजकारणात खोपडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे विश्‍वासू मानले जातात. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख