मराठा क्रांती मोर्चातर्फे 26 नोव्हेंबरला विधानभवनाला घेराव

मराठा क्रांती मोर्चातर्फे 26 नोव्हेंबरला विधानभवनाला घेराव

नाशिक : विविध प्रलंबित मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे येत्या 16 ते 26 नोव्हेंबर दरम्यान राज्यात मराठा संवाद यात्रा काढण्यत येणार आहे. या यात्रेचा समारोप 26 नोव्हेंबरला विधान भवनाला घेराव घालून करण्यात येणार आहे. यासंदर्भात शहर व परिसरातील विविध कार्यकर्त्यांची बैठक झाली. बैठकीला मराठा क्रांती मोर्चाचे प्रमुख पदाधिकारी मात्र अनुपस्थित होते. बैठक होणार की नाही याविषयी आधी संभ्रम होता. 

समाजाने आपल्या मागण्यांसाठी शांततेत शिस्तीत व संयमाने आपल्या मागण्या सरकारकडे मांडल्या. त्यासाठी 57 मुक मोर्चे काढले. त्याची सगळ्यांनी नोंद घेतली. मात्र समाजाचे प्रश्न सुटले नाहीत. भाजप सरकारने मराठा समाजास खेळवत ठेवून समाजाची घोर फसवणूक केली आहे.याविरोधात मराठा समाजात तीव्र संतापाची भावना आहे असा आरोप या बैठकीत करण्यात आला. 

मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वय समितीने सातत्याने उद्रेक, हिंसेचा मार्ग टाळून शांततेच्या मार्गाचा पुरस्कार केला आहे. त्याला अनुसरूनच समाजाच्या शेवटच्या स्तरापर्यंत संवाद साधणे, समाजात जागृती करणे, तरुणांना आत्महत्यांपासून परावृत्त करण्यासाठी प्रबोधन करणे व आंदोलनाला निर्णायक दिशा देण्यासाठी 16 ते नोव्हेंबर या कालावधीत राज्यातल्या प्रत्येक महसुली विभागात मराठा संवाद यात्रा काढण्यात येईल. या बैठकीस माजी नगरसेवक शिवाजी सहाणे, करण गायकर, तुषार जगताप, गणेश कदम, शरद तुंगर, राजू देसले, संजीव भोर, सचिन पवार, विलास जाधव, संदीप लभडे, अमित नडगे, सचिन शिंदे आदी उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com