Kothoda village gets Adarsh Gram bhushan award | Sarkarnama

यवतमाळमधील कोठोडा गावास आदर्शगाव भूषण प्रथम पुरस्कार

सरकारनामा
मंगळवार, 3 सप्टेंबर 2019

मुंबई  :  यवतमाळ जिल्ह्यातील मौजे कोठोडा या गावास  प्रथम क्रमांकासह  शासनाचा महाराष्ट्र आदर्शगाव भूषण पुरस्कार मिळाला आहे  . पाच लाख रुपये आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या  पुरस्काराची  घोषणा मृद व जलसंधारण मंत्री प्रा. डॉ.तानाजीराव सावंत यांनी आज येथे केली . 

मुंबई  :  यवतमाळ जिल्ह्यातील मौजे कोठोडा या गावास  प्रथम क्रमांकासह  शासनाचा महाराष्ट्र आदर्शगाव भूषण पुरस्कार मिळाला आहे  . पाच लाख रुपये आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या  पुरस्काराची  घोषणा मृद व जलसंधारण मंत्री प्रा. डॉ.तानाजीराव सावंत यांनी आज येथे केली . 

सन 2009 -10 पासून शासकीय योजनांची गावांमध्ये उत्कृष्ट अंमलबजावणी करून गावाचा सर्वांगिण विकास साधणारी गावे, संस्था तसेच व्यक्तिंना आदर्श गाव योजनेअंतर्गत पुरस्काराने गौरविण्यात येते. उत्कृष्ट आदर्श गाव पुरस्कारामध्ये द्वितीय क्रमांकासाठी (तीन लाख रु.) नांदेड जिल्ह्यातील मौजे शेळगाव गौरी (ता. नायगाव) व पुणे जिल्ह्यातील मौजे भागडी (ता. आंबेगाव) या गावांची तर तृतीय क्रमांकासाठी (दोन लाख रु.) नागपूर जिल्ह्यातील गोधनी (ता. उमरेड) व रत्नागिरी जिल्ह्यातील विरसाई (ता. दापोली)  या गावांची विभागून निवड करण्यात आली आहे.

उत्कृष्ट प्रकल्प कार्यान्वय अभिकरण संस्था गटात प्रथम क्रमांक (एक लाख रु. ) ज्ञानशक्ती विकास वाहिनी,डीएसके बिल्डिंग, मंचर, ता. आंबेगाव यांना तर द्वितीय क्रमांक (50 हजार रु.) प्रादेशिक बहुद्देशीय शिक्षण व आरोग्य सेवा संस्था, मु.पो. गोधनी, ता. उमरेड, जि. नागपूर व तृतीय पुरस्कार (20 हजार रु. ) विकास सामाजिक संस्था, वरोरा,जि. चंद्रपूर यांना जाहीर झाला आहे.

उत्कृष्ट ग्राम कार्यकर्ता पुरस्कारामध्ये प्रथम क्रमांक (25 हजार रु.) सुनील दत्तात्रय पावडे, मौजे कोठोडा, ता. पांढरकवडा, जि. यवतमाळ यांना तर द्वितीय पुरस्कार (15 हजार रु.) काशिनाथ यादवराव शिंपाळे, मौजे शेळगाव गौरी,ता. नायगाव, जि. नांदेड आणि तृतीय पुरस्कार (10 हजार रु. विभागून) परम तुकाराम काळे, मौजे गोधनी, जि. नागपूर व ज्ञानेश्वर वसंत उंडे, मौजे भागडी, ता. आंबेगाव, जि. पुणे यांची निवड झाली आहे.  या पुरस्कारांचे वितरण लवकरच होणार असल्याचे प्रा.डॉ. सावंत यांनी सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख