Konkan Teacher's transfers issue will be solved | Sarkarnama

 कोकणातील  रखडलेल्या शिक्षक बदल्या यावर्षी होणार :  अश्विनी खानविलकर  

सरकारनामा
सोमवार, 17 डिसेंबर 2018

.

रत्नागिरी : कोकणातील पाचही जिल्ह्यातील रखडलेली प्राथमिक शिक्षक बदली प्रक्रिया कोणत्याही परिस्थितीत यावर्षी राबवली जाईल, असा विश्‍वास मुंबई भाजपा महिला मोर्चा सचिव अश्विनी खानविलकर यांनी व्यक्‍त केला.

राज्य शासनाने प्राथमिक शिक्षक बदल्यांची प्रक्रिया कोकण वगळता अन्य 29 जिल्ह्यात राबवली. त्यामुळे वर्षानुवर्षे अवघड क्षेत्रात काम करणारे शिक्षक, पती-पत्नी एकत्रीकरण आदी शिक्षक यांना बदली प्रक्रियेमुळे फार मोठा दिलासा मिळाला आहे; परंतू आचारसंहिता, शिक्षक संघटना व शिक्षक संघटनेच्या स्वयंघोषित पुढाऱ्यांचे दबावतंत्र यामुळे बदली प्रक्रिया संपूर्ण कोकणात राबवली गली नाही. 

शासन निर्णयानुसार संवर्ग 1, 2, 3, 4 मधील सर्व शिक्षकांना या बदली प्रक्रियेपासून वंचित रहावे लागले होते. विद्यार्थी हित आणि शैक्षणिक नुकसान टाळणे यासाठी कोकणातील जिल्ह्यांमधून ही बदली प्रक्रिया राबवली जाणे आवश्‍यक होते.

 ही बाब  कोकण बदली हवी टीमचे विश्वास बेलवलकर यांनी अश्विनी खानविलकर यांच्या निदर्शनास आणून दिली . त्यानंतर अश्विनी खानविलकर यांनी शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडे याप्रश्नाचा पाठपुरावा केला .

   शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे  आणि ग्रामविकास सचिव असिम गुप्ता यांनी 'बदली हवी' टीमचे विश्वास बेलवलकर आणि इतर सदस्य  तसेच खानविलकर यांच्याशी  चर्चा करून कोकणातील सर्व जिल्ह्यांची रखडलेली जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया त्वरित राबवण्याची सूचना संबंधित जिल्हा परिषदांना दिली आहे. त्यामुळे कोकणातील अनेक शिक्षकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख