उद्धव ठाकरेंशी भेट झाल्याची आमदार भास्कर जाधवांची कबुली

2004 ला शिवसेना कशामुळे सोडावी लागली. त्यावेळी नेमके काय-काय घडले, यावर उदधव ठाकरे यांच्याशी झालेल्या भेटीत चर्चा झाली. त्यावेळचे खरे काय आणि खोटे काय याची माहिती घेतली. ठाकरेंनाही अनेक गोष्टी कळून चुकल्या. या चर्चेमुळे 15 वर्षानी मनात असलेले दडपण, जळमटे निघून गेली. चर्चेदरम्यान ठाकरेंनी पक्षात येण्याचे निमंत्रण दिले आहे. त्यावर आपण कसलीही प्रतिक्रिया दिलेली नाही - भास्कर जाधव
NCP MLA Bhaskar Jadhav
NCP MLA Bhaskar Jadhav

चिपळूण : आमदार भास्कर जाधव यांनी सपशेल कोलांटी मारली. त्यांच्या संबंधात मातोश्रीच्या भेटीबाबत नकाराचे खुलासे करणारे त्यांचे निकटवर्तीय सपशेल उताणे पडले. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याशी रविवारी (ता.25) भेट झाली, असे येथे पत्रकार परिषदेत मान्य करून अनपेक्षितरीत्या भेट झाल्याचे त्यांनी सांगितले आहे. ठाकरे यांनी शिवसेनेत येण्याचे निमंत्रण या भेटीत दिले, मात्र त्यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, असेही त्यांनी सांगितले आहे.

भास्कर जाधव म्हणाले, "2004 ला शिवसेना कशामुळे सोडावी लागली. त्यावेळी नेमके काय-काय घडले, यावरच भेटीत चर्चा झाली. त्यावेळचे खरे काय आणि खोटे काय याची माहिती घेतली. ठाकरेंनाही अनेक गोष्टी कळून चुकल्या. या चर्चेमुळे 15 वर्षानी मनात असलेले दडपण, जळमटे निघून गेली. चर्चेदरम्यान ठाकरेंनी पक्षात येण्याचे निमंत्रण दिले आहे. त्यावर आपण कसलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. कुटुंब आणि मतदारसंघातील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून पुढचा निर्णय घेऊ. गेल्या चार-पाच दिवसांपासून उद्धव ठाकरे व माझ्या भेटीच्या बातम्या माध्यमातून पसरवल्या जात आहेत. रविवारी (ता. 25) ठाकरेंसोबत अचानक भेट झाली. गेल्या काही महिन्यांपासून उद्धव ठाकरेंशी दूरध्वनीवरून संवाद सुरू होता, मात्र प्रत्यक्षात भेट रविवारी झाली.'' 

''गेल्या चार दिवसांपासून गुहागर मतदारसंघासह राज्यातील हितचिंतक दूरध्नीवरून संपर्क साधू लागले आहेत. तुम्ही जो निर्णय घ्याल, तो आम्हाला मान्य असेल, तुम्ही तिथे आम्ही, अशा लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. शिवसेना प्रवेशावर कोणताच निर्णय अथवा चर्चा झालेली नाही. कार्यकर्त्यांच्या सल्लामसलतीनंतरच काय ते पाहू,'' असेही भास्कर जाधव म्हणाले. 

शरद पवार यांच्याशीही चर्चा
उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी दूरध्वनीवरून आपले बोलणे झाले. जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली. शिवसेनेत जाण्याबाबत कोणतीही चर्चा पवार यांच्याशी झाली नाही, असेही जाधव यांनी सांगितले. 

हे देखिल वाचा -


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com