आधीचे जेलमध्ये टाकायचे, आताचे गोळ्या घालतात : बी. जी. कोळसे पाटील - Kolse Patil Nagar Program | Politics Marathi News - Sarkarnama

आधीचे जेलमध्ये टाकायचे, आताचे गोळ्या घालतात : बी. जी. कोळसे पाटील

सूर्यकांत नेटके
रविवार, 28 जानेवारी 2018

''आताच नाही तर गेल्या अनेक देशात वर्षापासून येथे बोलू दिले जात नाही. जो बोलेल त्याला संपवण्याचे काम सुरु आहे. आम्ही बोलतो म्हणून पुर्वीचे सरकार जेलमध्ये टाकत होते, हे सरकार मारुन टाकतेय. केवळ स्वतंत्र विचार करणारी पिढी निर्माण केली नाही त्याचे हे परिणाम आहेत. अशीच परिस्थिती राहिली आणि आताचे सरकार असेच बळावत गेले तर लोकशाही संपलेली असेल,'' असे प्रतिपादन माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी येथे केले.

नगर : ''आताच नाही तर गेल्या अनेक देशात वर्षापासून येथे बोलू दिले जात नाही. जो बोलेल त्याला संपवण्याचे काम सुरु आहे. आम्ही बोलतो म्हणून पुर्वीचे सरकार जेलमध्ये टाकत होते, हे सरकार मारुन टाकतेय. केवळ स्वतंत्र विचार करणारी पिढी निर्माण केली नाही त्याचे हे परिणाम आहेत.
अशीच परिस्थिती राहिली आणि आताचे सरकार असेच बळावत गेले तर लोकशाही संपलेली असेल,'' असे प्रतिपादन माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी येथे केले.

शब्दगंध साहित्य परिषदेच्या 13 व्या शब्दगंध साहित्य संमेलनाचे आज माजी न्यायमुर्ती कोळसे पाटील यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. संमेलनाध्यक्ष भारत सासणे, प्राचार्य शिवाजीराव देवढे, साहित्यिक लहू कानडे, प्रा. राम बाहेती, प्राचार्य डॉ. बाळ कांबळे, ज्ञानदेव पांडूळे, उत्तमराव पाटील,
प्रा. स्मिता पानसरे, मेधा काळे, कोपरगावचे नगराध्यक्ष विजय वहाडणे, साहित्य परिषदेचे राजेंद्र उदागे, सुनील गोसावी यांची उपस्थिती होती.

कोळसे पाटील म्हणाले, ''आज न्यायसंस्थेने नव्हे लोकांनी डोळ्यावर पट्टी बांधल्यासारखी स्थिती आहे. न्यायव्यवस्थेवरील विश्‍वासाचाच प्रश्‍न निर्माण होऊ पाहत आहे. देशात 'डर का माहोल' आहे. सध्या लोकशाही संपुष्टात आणण्याचे काम सुरु आहे. सरकार आणिव्यवस्थेवर जो बोलेल त्याला संपवले जात
आहे. पुर्वीचे सरकार जेलमध्ये टाकायचे, सध्याचे गोळ्या घालतेय, एवढाच फरक आहे. स्वतंत्र विचाराची तरुण पिढी जो पर्यत तयार होत नाही, तो पर्यंत परिस्थिती बदलेल असे वाटत नाही. मनुवादी विचाराने छत्रपती संभाजी महाराजांचा छळ केला तेच लोक आता संभाजीच्या नावावर दंगली करत आहेत.'' कोरेगाव भीमाचा प्रकार एका दिवसाचा नाही तर त्यासाठी आधी चार महिने काम केले जात असल्याचा आरोप कोळसे पाटील यांनी यावेळी केला.

देशाला आणि समाजाला फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारच तारु शकतात असे ते म्हणाले. सासणे, बाहेती, डॉ. कांबळे, पांडूळे यांची यावेळी भाषणे झाली. जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे, डॉ. कैलास दौंड, ज्येष्ठ साहित्यिक व संशोधक डॉ. शरद गायकवाड, प्रा. डॉ. जयदेव डोळे, अॅड. सुभाष लांडे, अॅड. बन्सी सातपुते, भारत गाडेकर, शेषराव पठाडे यांच्यासह साहित्य रसिक उपस्थित होते.

तर मलाही मारले असते
कोळसे पाटील म्हणाले, ''कॉम्रेड गोविंद पानसरे यांची हत्या झाली त्यावेळी मी त्याच्या घराकडे चाललो होते. मी पोचण्याआधी दहा मिनिटे त्यांना गोळ्या मारल्या. जर मी त्यावेळी तेथे पोचले असतो तर मलाही गोळ्या घालून मारले
असते. सध्याची परिस्थिती गंभीर आहे. त्यात आम्ही रोकठोक बोलतोत. त्यामुळे आमचा नंबर कधीही लागू शकतो.''

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख