कोल्हे आणि आढळराव यांच्यात श्रेयबाजीवरून `तू-तू-मै-मै'

राष्ट्रवादीचे शिरूरचे (जि.पुणे) खासदार डॉ. अमोल कोल्हे व शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात मतदारसंघातील प्रश्नांच्या पाठपुराव्यावरून सुरु असलेला कलगीतुरा कायम आहे.
कोल्हे आणि आढळराव यांच्यात श्रेयबाजीवरून `तू-तू-मै-मै'

पिंपरीः राष्ट्रवादीचे शिरूरaचे (जि.पुणे) खासदार डॉ. अमोल कोल्हे व शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात मतदारसंघातील प्रश्नांच्या पाठपुराव्यावरून सुरु असलेला कलगीतुरा कायम आहे. 

आढळरावांना १५ वर्षे जमले नाही,ते मी एका वर्षात करून दाखविले,असे डॉ.कोल्हे यांनी शनिवारी पिंपरी-चिंचवडमध्ये सांगत आढळरावांना पुन्हा एकदा डिवचले. तरीही ते ज्येष्ठ असल्याने शिरूरच्या विकासासाठी त्यांचे मार्गदर्शन घेईन, असा टोमणाही कोल्हेंनी यावेळी लगावला.

शिवनेरी किल्यावरील रोप वे आणि शिवसृष्टी तसेच वढू बुद्रूक येथील शंभूसृष्टीला केंद्राने सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे खा.कोल्हे यांनी नुकतेच (ता.१८) मुंबईत त्यासंदर्भातील पत्रे दाखवून सांगितले होते. तर,ही कामे आपल्या कारकिर्दीतच मार्गी लागली असून त्याची वर्षापूर्वीची पत्रे आपल्याकडे असल्याचा दावा आढळराव यांनी परवा शिरूरला (ता.२०) केला होता. त्यासंदर्भात पिंपरी-चिंचवडमधील प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी शहरात आलेल्या खा.कोल्हेंना आढळरावांच्या दाव्याविषयी विचारले असता वर्षभरापूर्वी या कामाची पत्रे आढळरावांकडे होती,तर ते आतापर्यंत गप्प का होते अशी विचारणा त्यांनी केली. ही विचारणा करताना आढळराव वयाने ज्येष्ठ आहेत. त्यांचा मी आदर करतो,असेही ते म्हणाले. 

१५ वर्षाचे प्रलंबित प्रश्न एका वर्षात मार्गी लागल्याचे आढळरावांनीच कबूल केल्याने त्यांचा मी आभारी आहे, असे ते  उपरोधिकपणे म्हणाले. १५ वर्षात जे जमले नाही,ते मी एका वर्षात करून दाखवले आहे. त्याचे परीक्षण जनता करेलच,असे सांगत त्यांनी आढळरावांना अप्रत्यक्षपणे आव्हानच दिले. तसेच हा वाद न वाढविता त्याचा चेंडू त्यांनी जनतेच्या दरबारात खुबीने टोलवला. मतदारसंघातील प्रश्न सुटणे माझ्या दृष्टीने महत्वाचे असून ते सोडविण्यासाठी खासदारकीचा तीन टर्मचा अनुभव असलेल्या आढळरावांचे मार्गदर्शन माझ्यासारखा नवा खासदार घेईन,असे त्यांनी नम्रपणे सांगितले. कारण मतदारसंघाच्या विकासासाठी ते महत्वाचे आहे,असे ते म्हणाले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com