kolhapurkar criticize sanjay raut | Sarkarnama

संजय राऊत 'बालिश'; कोल्हापुरातून टीका!

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 16 जानेवारी 2020

संभाजीराजे यांच्याकडे छत्रपती शिवराय यांचे वंशज असल्याचा पुरावा मागून त्यांनी सामाजिक जीवन अस्थिर करण्याचा प्रयत्न केला आहे.

कोल्हापूर : छत्रपती घराण्याचा अपमान करणाऱ्या संजय राऊत यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी उदयनराजे भोसले प्रतिष्ठानच्यावतीने जिल्हा प्रशासनाकडे एका निवेदनाद्वारे केले. 

निवेदनात म्हटले आहे की, उदयनराजे भोसले यांच्याकडे छत्रपती शिवरायांचे वंशज असल्याचे पुरावे मागून खासदार संजय राऊत यांनी छत्रपती घराण्याचा अवमान केला आहे. खासदार राऊत यांची मागणी ही बालिशपणाची आहे.  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा वापर राजकारणासाठी करू नये. तरीही, राजकारणासाठी त्यांचा वापर केला जात आहे. संभाजीराजे यांच्याकडे छत्रपती शिवराय यांचे वंशज असल्याचा पुरावा मागून त्यांनी सामाजिक जीवन अस्थिर करण्याचा प्रयत्न केला आहे.

यावेळी, मयूर भोसले, शैलेश जाधव, पृथ्वीराज उन्हाळे, आदित्य भोसले, सुरज माने उपस्थित होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख