संभाजीराजेंनी कोणत्या पक्षात जावे? लोकांनी सुचविले भन्नाट पर्याय...

छत्रपती संभाजीराजेंनी Chhatrapati Sambhajiraje स्वतंत्र पक्ष काढून वंचित बहुजन आघाडीसोबत Vanchit Bahujan Aghadi निवडणुकीला Election सामोरे जावे, यातून महाराष्ट्राला Maharashtra मजबूत पर्याय मिळेल, असे काहींनी सुचविले आहे.
संभाजीराजेंनी कोणत्या पक्षात जावे? लोकांनी सुचविले भन्नाट पर्याय...
Sambhajiraje Chhatrapatisarkarnama

कोल्हापूर ः कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांची खासदारकीची मुदत संपली आहे. त्यामुळे कोणता निर्णय घेणार याची उत्सुकता आहे. त्यांनी नेमकी कोणती भूमिका घ्यावी, यासाठी त्यांना लोकांनी अनेक भन्नाट पर्याय सुचविले आहेत. यामध्ये वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रवादी, शिवसेनेत जाण्याचा सल्लाही काहींनी दिला आहे.

कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांची राज्यसभेच्या खासदारकीची मुदत संपली आहे. लवकरच आपली राजकिय भूमिका जाहीर करणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. ते काँग्रेसमध्ये आले तर त्यांचे स्वागतच आहे, अशी भूमिका गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी मांडली होती. त्यामुळे संभाजीराजे यांच्यासाठी कोणता पक्ष योग्य राहिल याविषयी 'सरकारनामा'ने लोकांकडून प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला असून लोकांनी त्यांना अनेक भन्नाट पर्याय सुचविले आहेत.

Sambhajiraje Chhatrapati
संभाजीराजे काँग्रेसमध्ये येणार? सतेज पाटलांचे सूचक संकेत

यातील बहुतांशी पर्याय हे वंचित बहुजन आघाडीत जावे असे असून त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेत जावे असे आहेत. तर भाजपमध्ये राहावे, हे काही निवडक प्रतिक्रियेत म्हटले आहे. तर काहींनी राजे हे संपूर्ण महाराष्ट्राचे असून ते कुठल्याही एका पक्षाचे असू शकत नाहीत. म्हणून त्यांनी कोणत्याच पक्षात प्रवेश करू नये, असेही काहींनी सूचविले आहे. छत्रपती शाहूंचे वंशज असल्याने ते स्वतः एक पक्ष आहेत. त्यामुळे त्यांनी कोणत्याही पक्षात न जाता न्यायदानाचे काम सुरू ठेवावे, असा सल्ला काहींनी दिला आहे.

Sambhajiraje Chhatrapati
Maratha Reservation :संभाजीराजे यांना सरकारकडून चर्चेसाठी निमंत्रण

काहींनी संभाजीराजेंनी स्वतंत्र पक्ष काढून वंचित बहुजन आघाडीसोबत निवडणुकीला सामोरे जावे, यातून महाराष्ट्राला मजबूत पर्याय मिळेल. राजे आणि आंबेडकर एकत्र आले तर महाराष्ट्रात नवी पर्याय उपलब्ध होईल. शाहू-आंबेडकर घराणे एकत्र येऊन राज्य व देशात सत्ता स्थापन करावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे. राजकारणातील शिळेपणा जाऊन ताजेपणा आणायचा असेल तर राजेंनी बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत जावे. अखंड महाराष्ट्र छत्रपती आणि आंबेडकर यांचा असेल बहुजनांच राज्य प्रस्थापित होईल, असे म्हटले आहे.

Sambhajiraje Chhatrapati
काँग्रेस प्रवेशाची ऑफर : संभाजीराजेंनी घेतला मोठा निर्णय; १२ मे रोजी करणार घोषणा

काहींनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राजेनी बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत राहुन काम कराव म्हणजे मराठी समाजाला आरक्षण मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यापेक्षा राजेंनी अठरापगड बारा बलुतेदारांना सोबत घेऊन स्वतंत्र पक्षाची स्थापना करावीव त्यातून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून द्यावा. छत्रपती शिवराया प्रमाणे वेगळे प्रस्थ निर्माण करावे. यात सर्व बहुजनांना सोबत घ्यावे.

Sambhajiraje Chhatrapati
प्रतापगड किल्ल्याला भेट देऊन राज्यपालांचे छत्रपती शिवाजी महाराजांना मनोभावे अभिवादन

फक्त मराठा मराठा करीत बसु नये. पेशवाईच्या मागे धावुन नये. निती, नियम छत्रपतींची व निती शाहु महाराजांची व संविधानानुसार काम करावे. कोणत्याही पक्षांच्या मागे धावुन नये. हा शिवमार्गाचा अपमान होईल.राष्ट्रवादी पक्षाने हा नेहमीच छत्रपतींच्या गादीचा सन्मान केला आहे. त्यामुळे राजेंनी राष्ट्रवादीत यावे, अशी अपेक्षा काहींनी मांडली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.