मराठ्यांना EWS चे आरक्षण नकोय : संभाजीराजेंची स्पष्ट भूमिका - we do not want reservation in EWS clarifies Sambhajiraje | Politics Marathi News - Sarkarnama

मराठ्यांना EWS चे आरक्षण नकोय : संभाजीराजेंची स्पष्ट भूमिका

तुषार रुपनवर
मंगळवार, 29 सप्टेंबर 2020

संभाजीराजे मुख्यमंत्र्यांना भेटून आपली भूमिका स्पष्ट करणार

मुंबई : मराठा आरक्षणासाठी सरकारने विरोधी पक्ष,वकिल सर्वांन एकत्रित आणले पाहीजे. ताकद लावून स्थिगिती उठवली पाहीजे.  मी या संदर्भात सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन मराठा आरक्षणासंदर्भात निवेदन देणार आहे, अशी माहिती खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी दिली. मात्र मराठ्यांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे (EWS) आरक्षण नको, अशी स्पष्ट शब्दांत मागणी त्यांनी केली.

ओबीसी समाजाच्या नेत्यांनी आज संभाजीराजे यांची भेट घेतली. त्यानंतर बोलताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केेली. मराठ्यांचा ओबीसीत समावेश करायला त्या समाजातील नेत्यांचा विरोध आहे. त्यावरून दोन्ही बाजू आक्रमकपणे बाजू मांडत आहेत. ओबीसी समाजाचे प्रकाश शेंडगे यांनी पोलिस भरती झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे. त्यावर बोलताना संभाजीराजे म्हणाले की आता  पोलिस भरती घेणे हे मराठा समाजाच्या तरूणांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. त्यामुळे सरकारने हि भरती किमान दोन महिने पुढे ढकलावी.

मराठा समाजाचे दोन आॅक्टोबर रोजी आंदोलन होणार आहे. या आंदोलनात मराठा समाजाच्या तरुणांनी सोशल डिस्टन्सचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.  आमचा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून (EWS)  आरक्षणाला विरोध आहे. हे आरक्षण आम्हांला नको आहे. संपूर्ण मराठा समाजाचा या आरक्षणाला विरोध आहे. या कोट्यातून मिळणारे आरक्षण संपूर्ण समाजासाठी नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. ओबीसी नेत्यांच्या भेटीबाबत बोलताना ते म्हणाले की ओबीसीमध्ये कशा प्रकारे मराठा समाजाला घेतां येईल, हे मला ओबीसी नेत्यांनी सांगितल आहे.  त्यांना फक्त एवढच बोललो की तुम्ही घेतलेली भूमिका सकारात्मक आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख