डॉ. मिणचेकरांच्या उमेदवारीसाठी सतेज पाटील, मुश्रीफ अन् यड्रावकरांना खुद्द मुख्यमंत्र्यांचा फोन

जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघाच्या राजर्षी शाहू शेतकरी आघाडी पॅनेलचे उमेदवार आज रात्री घोषित केले जाणार आहेत.
uddhav thackeray calls for representation of sujit minachekar in gokul election
uddhav thackeray calls for representation of sujit minachekar in gokul election

कोल्हापूर : जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघातील विरोधी पॅनले असलेल्या राजर्षी शाहू शेतकरी आघाडी पॅनेलचे उमेदवार आज रात्री घोषित केले जाणार आहेत. आता माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांना उमेदवारी द्यावी, यासाठी खुद्द मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पालकमंत्री सतेज पाटील, कामगारमंत्री हसन मुश्रीफ व आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आहे. 

गोकुळच्या निवडणुकीत विरोधी पॅनेलमध्ये कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज दिवसभर यासाठी गाठीभेटी व मॅरेथॉन बैठका सुरु आहेत. तसेच, विरोधी पॅनेलमध्ये पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या नेतृत्वाखाली खासदार संजय मंडलिक, माजी आमदार विनय कोरे, माजी आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार के. पी. पाटील यांच्यासह गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्‍वास पाटील, अरुण डोंगळे यांनी पॅनेलची बांधणी केली आहे. 

उमेदवारी देताना या सर्वच नेत्यांचा आता कस लागणार आहे. उमेदवारीसाठी काही दिवसांपूर्वी मुलाखती झाल्या. त्यावेळी इच्छुक उमेदवारांना उमेदवारी मिळो अगर न मिळो शेतकऱ्यांसाठी तुम्ही एकत्र राहणे गरजेचे आहे, असे आवाहन या सर्व नेत्यांनी केले होते. विविध ठिकाणी आज झालेल्या बैठकांतही हाच सूर  या नेत्यांकडून आळवण्यात आला. 

आज रात्री पॅनेल जाहीर केले जाणार आहे. त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार म्हणून माजी आमदार मिणचेकर यांना उमेदवारी मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांनीच सतेज पाटील, मुश्रीफ आणि  यड्रावकर यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली. त्यामुळे विरोधी पॅनेलमध्ये डॉ. मिणचेकर यांचे नाव राहण्याची शक्यता आहे. परंतु, हे प्रत्यक्षात उतरते की नाही हे पॅनेल जाहीर झाल्यानंतरच समोर येईल. यामुळे शिवसेनाही या निवडणुकीत सक्रीय झाल्याचे चित्र आता दिसू लागले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com