विधान परिषदेवरील निवडीसारखीच राजू शेट्टी यांची या गावात परीक्षा : थेट मंत्र्याशी सामना - tough fight for Raju Shetty and minister Yedravkar in Shirti village | Politics Marathi News - Sarkarnama

विधान परिषदेवरील निवडीसारखीच राजू शेट्टी यांची या गावात परीक्षा : थेट मंत्र्याशी सामना

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 30 डिसेंबर 2020

राज्यमंत्री यड्रावकर गटाचेही जोरदार आव्हान 

शिरोळ ः शिरटी (ता. शिरोळ) येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत माजी खासदार राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना व आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या गटात चुरशीची व प्रतिष्ठेची लढत होण्याचे संकेत आहेत. राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवरील निवडीची राजू शेट्टी यांना प्रतिक्षा आहे. मात्र या गावातील निकालाचेही असेच औत्सुक्य असणार आहे. 

मंत्री यड्रावकर व शेट्टी यांना सत्ता संपादन करण्यासाठी वेगवेळ्या टेकू असलेल्या पक्षांचा व गटांचा आधार घ्यावा लागणार आहे. लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत येथील जनतेचा कल, निवडणुकीतील उमेदवार पाहून त्या उमेदवाराच्या पाठीशी गावातील नागरिक राहण्याची परंपरा आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांना या गावाने नेहमीच साथ दिली आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत यड्रावकर गटाच्या कार्यकर्त्यांना दारुण पराभव पत्करावा लागला होता. 13 पैकी 12 जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिंकून येथे सत्तांतर झाले होते.

तथापी पाच वर्षांत वेगवेगळ्या घडामोडी घडल्या आहेत. गावचा कारभार करणाऱ्या कार्यकर्त्यांची मने सांभाळली नसल्याचे वातावरण आहे. यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पाठिंबा देणारे काही कार्यकर्ते, तसेच स्वाभिमानीतील निष्ठावंत कार्यकर्ते संतोष पाटील यड्रावकर गटाच्या आघाडीत सामील झाले आहेत. तथापी यादव गटाचे निष्ठावंत अभय गुरव हे स्वाभिमानी संघटनेच्या युतीत सामील झाले आहेत. मंत्री यड्रावकर व माजी खासदार शेट्टी यांनी शिरटीची निवडणूक प्रतिष्ठेची बनविली आहे. यामुळे या ठिकाणची दुरंगी लढत रंगतदार बनणार आहे.

दृष्टिक्षेपात
*प्रभाग : 5
*सदस्य : 13
*मतदार : 4224
*पुरुष मतदार 2193
*महिला मतदार 2031

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख