Kolhapur : तुमच्यावरील गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही... संजय पवारांचा क्षीरसागरांचा टोला

कोल्हापूरातील शिवसेनेच्या Kolhapur Shivsena मेळाव्यात जिल्हा प्रमुख संजय पवार Sanjay Pawar यांनी शिंदे गटात सहभागी झालेले माजी आमदार राजेश क्षीरसागर Rajesh Kshrisagar यांची ऑडिओ क्लिपच Audio Clip ऐकवली.
Rajesh Kshrisagar, Sanjay Pawar
Rajesh Kshrisagar, Sanjay Pawarsarkarnama

कोल्हापूर : शिवसेनेच्या कोल्हापूर येथील मेळाव्यात जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी माजी आमदार राजेश क्षीरसागर यांची एक ऑडिओ क्लिपच ऐकवली. या ऑडिओ क्लिपमध्ये निवडून येण्यासाठी शिवसेनाच पाहिजे असं नाही, असे राजेश क्षीरसागर म्हणतात. याच त्यांच्या वाक्यावर संजय पवार संतप्त झाले. ''तुम्ही कितीही रंग बदलले तरी तुमच्या कपाळावर आणि पाठीवर पडलेला गद्दारचा शिक्का पुसला जाणार नाही,'' अशा शब्दात श्री. पवारांनी क्षीरसागर यांचा समाचार घेतला.

शिवसेनेत झालेल्या एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर आता पक्षाची पुनर्बांधणी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. त्यासाठी जिल्हास्तरावर मेळावे होत आहेत. या मेळाव्यातून बंडखोरांबद्दल शिवसैनिकांकडून संताप व्यक्त होत आहे. असाचा प्रकार कोल्हापूरातील शिवसेनेच्या मेळाव्यात पहायला मिळाला. जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी शिंदे गटात सहभागी झालेले माजी आमदार राजेश क्षीरसागर यांची ऑडिओ क्लिपच ऐकवली.

Rajesh Kshrisagar, Sanjay Pawar
हा केवळ भास आहे, यापूर्वी शिवसेना अशा अनेक संकटांतून बाहेर पडलेली आहे...

श्री. पवार यांनी यावेळी राजेश क्षीरसागर यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचीही मागणी केली. संजय पवार यांनी भर मेळाव्यात ऐकवलेल्या या ऑडिओ क्लिपमध्ये निवडून येण्यासाठी शिवसेनाच पाहिजे असं नाही, असे राजेश क्षीरसागर म्हणत होते. याच त्यांच्या वाक्यावर संजय पवार संतप्त झाले. ''तुम्ही कितीही रंग बदलले तरी तुमच्या कपाळावर आणि पाठीवर पडलेला गद्दारचा शिक्का पुसला जाणार नाही,'' अशा शब्दात पवारांनी क्षीरसागर यांचा समाचार घेतला.

Rajesh Kshrisagar, Sanjay Pawar
उद्धव ठाकरेंनी घातली भावनिक साद : शिवसैनिकांना झाले अश्रू अनावर

कोल्हापुरातील शिवसेनेत नेहमीच गटबाजी पाहायला मिळाली आहे. 2004 च्या विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून इच्छुक असलेल्या संजय पवारांना पक्षाने तिकीट नाकारत राजेश क्षीरसागर यांना संधी दिली होती. इथूनच त्यांच्यामधील वादाला सुरुवात झाली. आता राजेश क्षीरसागर शिंदे गटात सामील झाल्याने संजय पवार यांना देखील त्यांच्यावर टीका करण्याची संधीच मिळाली आहे.

Rajesh Kshrisagar, Sanjay Pawar
राजेश क्षीरसागर, रवींद्र फाटक यांना मिळणार आमदारकीचं बक्षीस?

दरम्यान, राजेश क्षीरसागर यांनी देखील संजय पवारांनी केलेल्या आरोपाला प्रतिउत्तर देत माझ्याकडेही संजय पवारांची व्हिडिओ क्लिप असल्याचा दावा केला आहे. ''माझ्या निवडणुकीत गद्दारी कोण करत होतं'' असा प्रश्न उपस्थित करत ते म्हणाले, निवडणुकीत तुमचंच डिपॉझिट जप्त झालं.'' या मेळाव्याला शिवसैनिकांना उपस्थित राहू नये म्हणून प्रयत्न झाले. तुमचे काम आम्ही मुख्यमंत्र्यांकडून करून देतो, असे सांगून त्यांना मेळाव्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न झाला. पण शिवसैनिकांनी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंवर विश्वास दाखवून आपण सर्वजण उपस्थित राहिल्याबद्दल त्यांनी आभार मानले. आता शिंदे गटातून त्यांनी निवडणूक लढवून दाखवाच, असेही त्यांनी आव्हान दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in