Kolhapur : मला पाडणारा जन्माला यायचा आहे...मुश्रीफांचे समरजीतसिंहांना आव्हान

मुश्रीफ Hasan Mushrif यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी Sloganism करून प्रकाश गाडेकर Prakash Gadekar यांचा पुतळा जाळण्यात The effigy was burnt आला. या मोर्च्यात हसन मुश्रीफ यांनी माफी मागावी, अशी मागणी केली.
Hasan Mushrif, Samarjeet Ghatge
Hasan Mushrif, Samarjeet Ghatgesarkarnama

कोल्हापूर : कागल विधानसभा मतदारसंघात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी थांबता थांबेनात. मला पाडणारा अजून जन्माला यायचा आहे, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी समरजितसिंह घाटगे यांना दिले आहे. घाटगे यांनी हसन मुश्रीफ यांना पराभूत करूनच आमदार होणार असल्याच वक्तव्य केले होतं. त्यावर मुश्रीफ यांनी ही प्रतिक्रिया दिली.

समरजितसिंह घाटगे यांच्या पत्नी नवोदिता घाटगे यांचा हसन मुश्रीफ यांचे कार्यकर्ते प्रकाश गाडेकर यांनी एकेरी उल्लेख केल्याच्या विरोधात आज कागलमध्ये मोर्चा काढून निषेध करण्यात आला. मुश्रीफ यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून प्रकाश गाडेकर यांचा पुतळा जाळण्यात आला. या मोर्च्यात हसन मुश्रीफ यांनी माफी मागावी, अशी मागणी केली.

Hasan Mushrif, Samarjeet Ghatge
सातारा शहर शिवसेना फुटणार; दहा पदाधिकारी शिंदे गटात सहभागी होणार

त्यामुळे कागलमधील राजकीय वातावरण तापलं आहे. त्याबाबत मुश्रीफ यांनी आम्ही महिलांचा आदरच करतो. आम्ही अस काही बोललो नाही, समरजितसिंह घाटगे अपरिपक्व आहेत ते अशा गोष्टींच राजकारण करत आहेत, अशी टीका त्यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com