रविकांत तुपकर भडकले; भुरट्या दादागिरीला भीक घालत नाही...

कारखान्यांनी Sugar Factory आठ दिवसांत शेतक-यांना Farmers थकती एफआरपीची FRP रक्कम द्यावी आणि बेकायदेशिररित्या गाळप करणा-यांवर कारवाई झाली पाहिजे.
रविकांत तुपकर भडकले; भुरट्या दादागिरीला भीक घालत नाही...

Ravikant Tupkar, Swabhimani andolan

sarkarnama

पंढरपूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्याला मारहाणीच्या निषेधार्थ आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली करमाळा तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. येथील मकाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय बागल यांनी मारहाण केली होती. या मारहाणीचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले आहेत. दरम्यान, रविकांत तुपकर म्हणाले, भुरटी दादागिरी आम्ही खपवून घेणार नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्याला कोणी मारहाण केली तर त्यास त्याच पध्दतीने उत्तर दिले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

दोन दिवसांपूर्वी स्वाभिमानी युवा संघटनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष विजय रणदिवे यांना करमाळा येथील मकाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय बागल यांनी मारहाण केली होती. या घटनेचा निषेध करण्यासाठी आज (सोमवार) स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली करमाळा येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात सोलापूर जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

<div class="paragraphs"><p>Ravikant Tupkar, Swabhimani andolan</p></div>
पंधरा दिवसांत बोंडआळी नुकसानग्रस्तांना भरपाई न दिल्यास मंत्र्यांना ठोकून काढू - रविकांत तूपकर

यावेळी माध्यमांशी बोलताना रविकांत तुपकर म्हणाले, भुरटी दादागिरी आम्ही खपवून घेणार नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्याला कोणी अशा पद्धतीने मारहाण करण्याचा प्रयत्न केला तर स्वाभिमानी शेतकरी संघटना ही त्याच पद्धतीने उत्तर देईल. शेतक-यांच्या न्याय हक्कासाठी जीव गेला तरी बेहत्तर पण स्वाभिमानी शेतकरी संघटना आता गप्प बसणार नाही थकीत एफआरपीची रक्कम जमा व्हावी यासाठी मोठे आंदोलन छेडेल.

<div class="paragraphs"><p>Ravikant Tupkar, Swabhimani andolan</p></div>
ऊसदर आंदोलन पुन्हा पेटले ; स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

कारखान्यांनी आठ दिवसांत शेतक-यांना थकती एफआरपीची रक्कम द्यावी आणि बेकायदेशिररित्या गाळप करणा-यांवर कारवाई झाली पाहिजे. अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात आगाडोंब उसळल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.