पडळकर मनोरुग्ण असून, ही पीडा भाजपला मातीत घालणार; शिवसेनेचीही वादात उडी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केल्याप्रकरणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.
shivsena sangli district chief sanjay vibhute slams gopichand padalkar
shivsena sangli district chief sanjay vibhute slams gopichand padalkar

सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केल्याप्रकरणी भाजपचे (BJP) आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. आता शिवसेनेनेही (Shivsena) पडळकर यांच्या विरोधात आघाडी उघडली आहे. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय विभूते (Sanjay Vibhute) यांनी पडळकर यांच्यावर हल्लाबोल केला आहे. पडळकर हे मनोरुग्ण असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

पडळकर यांनी सोलापुरातील पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महाविकास आघाडीतील नेत्यांवर खालच्या पातळीवर टीका केली होती. त्यावरून त्यांच्या भाषेबद्दल नाराजी व्यक्त होत आहे. यानंतर त्यांच्या गाडीवर सोलापुरातील मड्डी वस्ती परिसरात काल (ता. ३०  सायंकाळी दगडफेक झाली होती. यात घटनेत कोणालाही इजा झालेली नव्हती. 

आता शिवसेनेही पडळकर यांच्या विरोधात हल्लाबोल केला आहे. शिवसेना जिल्हाध्यक्ष विभूते म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये गोपीचंद पडळकर हा मनोरुग्ण फिरत आहे. तो काहीही बरळत असतो. प्रसिद्धीला हपापलेले असा हा नेता आहे. पडळकर ही पीडा भाजपची माती केल्याशिवाय राहणार नाही. देवालाही फसवले अशी माणसाला प्रसिद्धी देऊ नका. मोठ्या नेत्यांच्यावर टीका करत बसला तर तुम्हाला पायाखाली घेतल्या शिवाय राहणार नाहीत. केवळ प्रसिद्धीसाठी गोपीचंद पडळकर स्टंट करत असतो. त्याला गांभीर्याने घेण्याची गरज नाही. महाविकास आघाडीमधील एक ही नेता त्याला गांभीर्याने घेत नाही.  

याआधी बोलताना पडळकर म्हणाले होते की, सर्वोच्च न्यायालयाने ओबीसीसंदर्भात राज्य सरकारला डेटा सादर करण्यास सांगितले होते. मात्र, राज्य सरकारने ते केले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचा आणि काँग्रेसचा डीएनए बहुजनविरोधी आहे. म्हणूनच काँग्रेसच्या नेत्याच्या मुलाने ओबीसीविरोधी याचिका दाखल केली आहे. त्याचबरोबर मी शरद पवार आणि अजित पवारांशी मुद्दयावरुन भांडतो.

महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून समाजासमाजामध्ये तेढ वाढविण्याचा प्रयत्न करत आहे. मूठभर लोक बहुजनांचा आवाज दाबत आहेत. ओबीसींना दिलेले संविधानिक अधिकार हिसकावून घेण्याचे प्रयत्न करत आहेत. ओबीसींमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोपही पडळकर यांनी केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com