शिवेंद्रसिंहराजेंना राजकिय पक्षांचं वावडं; आम्हाला तोंड उघडायला लावू नका...संजय राऊत

राज्यसभेची उमेदवारी Rajya Sabha candidature देताना शिवसैनिकच Shiv Sainik निवडून जाणार, हे आमचं ठरलं होतं. सुरुवातीपासूनच सामान्य शिवसैनिकांच्या नावांचा शिवसेना shivsena विचार करत होती.
Sanjay Raut, Shivendraraje Bhosale
Sanjay Raut, Shivendraraje Bhosalesarkarnama

कोल्हापूर : राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेने संभाजीराजेंचा गेम केला, अशी टीका भाजपचे साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी काल केली होती. या टीकेवरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवेंद्रसिंहराजे यांचा समाचार घेतला. शिवेंद्रसिंहराजे यांनी स्वत: कितीवेळा पक्षं बदलला, असा प्रश्न उपस्थित करून त्यांना राजकीय पक्षांचं वावडं आहे का. आम्हाला तोंड उघडायला लावू नका, अशा शब्दात त्यांनी शिवेंद्रसिंहराजेंना ठणकावले.

खासदार संजय राऊत यांनी आज कोल्हापूरात पत्रकारांशी संवाद साधला. संजय राऊत यांनी संभाजीराजेंच्या उमेदवारीवरुन शिवसेनेवर टीका करणाऱ्या विरोधकांना चांगलेच फटकारले आहे. छत्रपतींच्या गादीविषयी आम्हाला पहिल्यापासूनच आदर होता आणि आजही आहे, असे सांगून श्री. राऊत म्हणाले, हा विषय छत्रपती संभाजीराजे आणि शिवसेनेतला आहे. इतरांनी त्यामध्ये चोमडेपणा करु नये. भाजपला इतकेच वाटत होते तर त्यांनी संभाजीराजे यांना ४२ मतं द्यायला पाहिजे होती, असे ही श्री.राऊत म्हणाले.

Sanjay Raut, Shivendraraje Bhosale
कराद्वारे लूटणारे ठाकरे सरकार देशातील पहिले : शिवेंद्रसिंहराजेंचा घाणाघात

राज्यसभेची उमेदवारी देताना शिवसैनिकच निवडून जाणार, हे आमचं ठरलं होतं. सुरुवातीपासूनच सामान्य शिवसैनिकांच्या नावांचा शिवसेना विचार करत होती. यामध्ये कोल्हापूरचे संजय पवार आणि नंदूरबारचे पारवे यांचा नावाचा विचार सुरु होता. पारवे हे देखील शिलेदाराप्रमाणे नंदूरबारमध्ये शिवसेनेची लढाई लढत आहेत. अशा शिलेंदारांना विधिमंडळात किंवा संसदेत प्रतिनिधित्व द्यायला हवे, ही उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे. याच भूमिकेतून आम्ही संजय पवार यांना संसदेत पाठवण्याचा निर्णय घेतला, असे राऊत यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in