शेकापचे सुभाष पाटील म्हणतात '...नाही तर आम्ही नदीत बसू' 

"येरळा नदीपात्रातील चोरटी वाहतूक बंद करा; नाही तर आम्ही येरळा नदीच्या पात्रात बसून आंदोलन करू,' असा इशारा शेतकरी कामगार पक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य ऍड सुभाष पाटील यांनी दिला आहे.
Shetkari Kamgar Paksha's Subhash Patil says '... otherwise we will sit in the river'
Shetkari Kamgar Paksha's Subhash Patil says '... otherwise we will sit in the river'

पुणे : "येरळा नदीपात्रातील चोरटी वाहतूक बंद करा; नाही तर आम्ही येरळा नदीच्या पात्रात बसून आंदोलन करू,' असा इशारा शेतकरी कामगार पक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य ऍड सुभाष पाटील यांनी दिला आहे. 

गेल्या काही दिवसांपासून सांगली जिल्ह्याच्या कडेगाव तालुक्‍यातील येरळा नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा सुरू आहे. वाळू चोरी बंद व्हावी; म्हणून व्यक्तिगत पातळीवर लोक मागणी करत आहेत. मात्र, वाळू चोरी थांबलेली नाही. दिवसेंदिवस वाळू चोरीत वाढ होत आहे,' असे सुभाष पाटील यांनी म्हटले आहे. 

"भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील थोर सेनानी हौसाताई पाटील यांनी वाळू थांबावी म्हणून आंदोलन केले होते. त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले तरी प्रशासन वाळू थांबवू शकत नाही. हे खेदजनक आहे,' असे पाटील म्हणाले. 

"येरळा नदीतून वाळू उपसा करायला परवानगी नसताना रात्री अपरात्री स्थानिक लोकांच्या आणि प्रशासनातील काही लोकांच्या डोळेझाक पणामुळे वाळू उपसा जोरात सुरू आहे. आम्ही अनेकदा लढा दिला आहे. आता आम्ही येरळा नदीपात्रात बसून आंदोलन करणार आहोत, असे आंदोलन केल्यावर तरी प्रशासनाला जाग येईल का?' असा सवाल शेकापचे पाटील यांनी विचारला आहे. 

पाटील यांनी पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे, "आपल्या तालुक्‍यातून येरळा नदी वाहत आहे. या नदीतून वाळू उपसा करण्यास सरकारची कोणतीही परवानगी नाही. तरीही येथील काही लोक नदीच्या काठावर त्यांच्या जमिनी आहेत, ते राजरोसपणे यारी आणि जीसीबी यांच्या साह्याने बेसुमार वाळू उपसा करीत आहेत.

तलाठी, संबंधित गावांतील पोलिस पाटील यांना याची संपूर्ण कल्पना असूनही ते त्यांच्यावर काहीही कारवाई करत नाहीत. या संदर्भात आम्ही हनमंतवडीये ग्रामस्थांनी अनेक वेळा आपल्याकडे पाठपुरावा केलेला आहे. अनेक वेळा आंदोलनेही केली आहेत. परंतु हा बेकायदा आणि बेसुमार चालेला वाळू उपसा बंद होत नाही. या संदर्भात आम्ही आपणास कळवू इच्छितो की आपण या वाळू उपशावर कायम स्वरूपी बंदोबस्त करून संबंधितांवर कडक कारवाई करावी,' असे पाटील यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, 'सुभाष पाटील यांच्यावर आंदोलन करण्याची वेळ येणार नाही. तालुक्‍यातील चोरटी वाळू आम्ही रोखू. तालुक्‍यातील अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल,'असे नायब तहसीलदार राजेंद्र यादव यांनी सांगितले आहे.  

Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com