ढवळ्याशेजारी बांधला पवळ्या....वाण नाही पण गुण लागला - Sadabhau khot and gopichand padalakr always criticized sharad pawar without reason | Politics Marathi News - Sarkarnama

ढवळ्याशेजारी बांधला पवळ्या....वाण नाही पण गुण लागला

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 24 डिसेंबर 2020

शरद पवारांवर खालच्या पातळीवर टीका करण्यात स्पर्धा

मुंबई : भाजपचे नेते गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत या दोघांमध्ये साम्य काय? दोघेही भाजपमध्ये बाहेरून आलेले आणि त्यांचा एकच कार्यक्रम तो म्हणजे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करणे. खालच्या पातळीवर टीका करण्यात या दोघांमध्ये स्पर्धा सुरू आहे की काय, अशी शंका सुरू आहे.

पडळकर यांनी कोरोना काळात पवारांवर अशीच अश्लाघ्य टीका केली होती. त्यानंतर खोत यांनीही शेतकरी कायद्याच्या अनुषंगाने पवार यांना खालच्या पातळीवर लक्ष्य केले. त्यामुळे `ढवळ्याशेजारी बांधला पवळ्या वाण नाही पण गुण लागला`, अशी तऱ्हा या दोघांची झाल्याचे चित्र आहे. खोत यांनी शेतकरी कृषी कायद्याच्या समर्थनार्थ आत्मनिर्भर यात्रा सुरू केली. या यात्रेच्या प्रारंभीच शरद पवारांवर टीका करून त्यांनी आपल्याकडे माध्यमांचे लक्ष वेधून घेतले.

यत क्रांती संघटना व भारतीय जनता किसान मोर्चाच्या वतीने आत्मनिर्भर यात्रेचा क्रांतिसिंह नाना पाटील यांची जन्मभूमी येडेमच्छिंद्र या गावातून करण्यात आला. या यात्रेच्या माध्यमातून गावागावात जाऊन या कृषी कायद्याचे महत्व पटवून देण्यात येणार आहे. या यात्रेचे उद्घाटन आमदार आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर उपस्थित होतेच.

खोत यांनी केलेल्य टिकेला राष्ट्रवादीने उत्तर दिले आहे. `स्वतः विश्वासघातकी भूमिका घेता आणि कुठल्या तोंडाने आमच्यावर टिका करत आहात, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सदाभाऊ खोत यांचा समाचार घेतला आहे. मंत्रीपदासाठी राजू शेट्टी यांचा विश्वासघात कुणी केला हे राज्याला माहीत आहे. यांचं राजकारणच विश्वासघातकी राहिलेलं आहे ते कुठल्या तोंडाने आमच्या नेत्यावर टिका करत आहेत असा सवालही नवाब मलिक यांनी केला आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख