सरकारच्या महानंदा डेअरीने अतिरिक्‍त दूध 27 रुपये लिटरने खरेदी करावे!

सरकारच्या महानंदा डेअरीने अतिरिक्‍त दूध 27 रुपये लिटरने खरेदी करावे!

कोल्हापूर : राज्यात दुधाचा महापूर आला आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे नुकसान होत आहे. हे नुकसान टाळण्यासाठी सरकारच्या महानंदा डेअरीने अतिरिक्‍त दूध 27 रुपये लिटरने खरेदी करावे, अशी मागणी खासदार राजू शेटटी यांनी केली आहे. 

खाजगी दूध संस्थांना अनुदान देताना त्यात काहीतरी गडबड होईल असे सरकारचे मत असावे. जर सरकारला असे वाटत असेल तर मग शासकीय डेअरी असलेल्या महानंदाकडेच राज्यातील अतिरिक्‍त दुधाचे संकलन करण्यात यावे. या अतिरिक्‍त दुधाची 27 रुपयेने लिटर दराने खरेदी करावी. जर महानंदाने हा दर दिला तर राज्यातील सर्वच संघांना हा दर देणे भाग आहे. महानंदाने अतिरिक्‍त दूध घेतल्याने मार्केट ही स्थिरस्थावर होईल आणि शेतकऱ्याला योग्य भाव मिळेल, असा विश्‍वास खा.शेटटी यांनी व्यक्‍त केला. 

महानंदाने जर हे दूध घेतले तर त्याचे बटर आणि पावडर करुन त्याची परदेशात विक्री करावी. हे उपपदार्थ करण्याचे काम राज्यातील अनेक संघ करतात. साधारण लिटरला 3 रुपये 50 पैसे घेवून ते दुधाची पावडर व बटर वेगळे करुन देतात. पुन्हा या कामाचे जागतिक टेंडर केले तर आणखी कमी दराने उपपदार्थ करुन मिळतील. या अतिरिक्‍त दुधाचे उपपदार्थात रुपांतर झाल्याने बाजारातील दुधाचा दर वाढेल. या पर्यायाचा सरकारने गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी खा.शेटटी यांनी केली आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com