वीज बिले देणार नाही...काय करायचे ते करा : राजू शेट्टींनी दिला इशारा

आज माजी खासदार राजूशेट्टी यांनी कोल्हापूर येथे महावितरणच्या ऑफिससमोर धरणे आंदोलन केले. यावेळी जेष्ठ नेते प्रताप होगाडे उपस्थित होते.आम्ही काही चंद्र सूर्य किंवा आकाशातील तारे मागत नाही,ताजमहाल मागत नाही. आम्ही फक्त आमची या अडचणीच्या काळातील वीज बिल माफ करा एवढीच मागणी करतोय, असे शेट्टी यावेळी म्हणाले.
Raju Shetty Agitation Against Electricity Bills in Kolhapur
Raju Shetty Agitation Against Electricity Bills in Kolhapur

कोल्हापूर : "कोरोनाच्या काळातील घरगूती वीजबिले आम्ही देणार नाही. मग तुम्ही काय करायचं ते करा."असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी वीज महावितरण कंपनीला दिला आहे. आज शेट्टी यांनी कोल्हापूर येथे महावितरणच्या ऑफिससमोर धरणे आंदोलन केले. यावेळी जेष्ठ नेते प्रताप होगाडे उपस्थित होते.

"आम्ही काही चंद्र सूर्य किंवा आकाशातील तारे मागत नाही,ताजमहाल मागत नाही. आम्ही फक्त आमची या अडचणीच्या काळातील वीज बिल माफ करा एवढीच मागणी करतोय." असे शेट्टी म्हणाले. "घरगुती ग्राहक वीज बिलात सवलत मागतोय ही देशातील पहिली घटना आहे. अस पाहिल्यादा होतंय. गेली चार महिने कोरोनामुळे  लोकांनी घरात कोंडून घेतलं आहे. लोकांना काम नाही, मिळकत नाही.अशा परिस्थितीत त्यांनी वीज बिल कस भरायचं?"हे तुम्हीच सांगा." असा सवाल त्यांनी महावितरण अधिकाऱ्यांना विचारला.

"वीज बिल माफ करा म्हणून चर्चा झाल्या, निवेदन दिली.आता जर वीज बिल माफ केलं नाही तर पुढचे आंदोलन वेगळे असेल." असा इशारा शेट्टी यांनी दिला आहे. "आम्ही काही ताजमहाल मागत नाही,घरगुती वीज बिल माफी मागतोय.पण वीज महामंडळ आमची थट्टा करत आहे. काहीही झालं तरी कोरोनाच्या काळातील घरगूती वीजबिल आम्ही देणार नाही. मग तुम्ही काय करायचं ते करा."असा इशारा शेट्टी यांनी दिला आहे. यावेळी प्रताप होगाडे यांनीही मार्गदर्शन केले.

दरम्यान, साताऱ्यात आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.लॉक डाऊनमुळे अनेकांना बेरोजगार व्हावे लागले असून लोकांचे व्यापार,उद्योग-धंदे ठप्प झाले त्यामुळे शेतकरी उध्वस्त झाला आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटामुळे दरमहा ३०० युनिटच्या आत येणाऱ्या ग्राहकांची वीज बिले माफ करावीत आणि सातारा जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली..
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com