Sangali : आदित्य ठाकरेंच्या सभेत पवारांची माणसं... गोपीचंद पडळकर

आदित्य ठाकरेंचा Aditya Thackeray दौरा झंझावाती म्हणता येणार नाही. त्यात थोडे काँग्रेसवाले Congress, थोडे राष्ट्रवादीवाले NCP आणि शिवसेनेचे Shivsena काही अशी माणसं येत आहेत.
BJP MLC Gopichand Padalkar
BJP MLC Gopichand Padalkar sarkarnama

सांगली : ज्या ज्या ठिकाणी आदित्य ठाकरेंची सभा होतेय तिथे शरद पवारांची माणसं उपस्थित असतात, असा आरोप करून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते गळ्यात भगवा मफलर टाकून शिवसेनेच्या नावानं घोषणा देत आहेत, असा टोला भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी लगावला आहे.

आटपाडी येथे खासगी सावकारीविरोधात काढलेल्या मोर्चानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, आदित्य ठाकरेंचा दौरा झंझावाती म्हणता येणार नाही. त्यात थोडे काँग्रेसवाले, थोडे राष्ट्रवादीवाले आणि शिवसेनेचे काही अशी माणसं येत आहेत.

BJP MLC Gopichand Padalkar
आटपाडी राडा : आमदार पडळकर अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात!

एका वृत्तवाहिनीच्या सर्व्हेत आता निवडणूका झाल्या तर शिवसेनेचे २-३ खासदार आणि १७-१८ आमदार निवडून येतील असे दाखवले. मग, झंझावात असता तर पोलमध्ये काहीतरी यायला पाहिजे होते. परंतू आता म्हसोबाला नाही बायको अन् सटवाईला नाही नवरा, अशी अवस्था या तिन्ही पक्षाची झालीय.

BJP MLC Gopichand Padalkar
शिवसेना कार्यकर्ते भाजप विरोधात पेटून उठतील!

पडळकर पुढे म्हणाले की, सध्या तिघेही एकमेकांना ॲडजेस्ट करून घेत आहेत. राज्यात जो दौरा सुरू आहे त्यात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अग्रेसर आहेत. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते गळ्यात भगवा मफलर टाकून शिवसेनेच्या नावानं घोषणा करतायेत. आमच्यावर किती हल्ले झाले त्याचे साक्षीदार तुम्ही आहात.

BJP MLC Gopichand Padalkar
देवेंद्रची कृपा म्हणून पडळकर अन्‌ मी आमदार, मंत्री झालो : सदाभाऊ खोत

आमच्या वाहनावर हल्ला झाल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी वेगळ्याप्रकारे मांडणी करत होते. पुण्यात इतके शिवसैनिक नाहीत, त्यापेक्षा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जास्त आहेत. ज्या ज्या ठिकाणी सभा होतेय तिथे शरद पवारांची माणसं उपस्थित असतात, असा आरोपही पडळकरांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com