सरकारच्या हातालाच नव्हे तर, बुद्धीलाही लकवा मारलाय...

काँग्रेस Congress, राष्ट्रवादीचे Nationalist congress नेते मजूर आणि ऊस तोड मजूरातून बँकेवर संचालक Bank director म्हणून जातात. त्यामुळे या सर्वांचेच अर्ज काढा, अशी आमची मागणी आहे.
सरकारच्या हातालाच नव्हे तर, बुद्धीलाही लकवा मारलाय...

Chandrakant Patil

sarkarnama

सांगली : महाआघाडी सरकारची सध्या कोणती बुद्धी चालत नाही. कोणतेही निर्णय या सरकारकडून घेतले जात नाहीत. या सरकारमध्ये कोणताही ताळमेळ नाही. त्यामुळे या सरकारच्या हातालाच नव्हे तर संपूर्ण बुद्धीला लकवा मारला आहे, अशी खरमरीत टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगलीत केली आहे. दरम्यान, सरकार सत्तेचा दुरुपयोग करून काहीही करू शकते, याचे उदाहरण म्हणजे प्रवीण दरेकरांना अपात्र करणे होय. पण, आम्ही या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात जाऊ. कारण, तेथे या सरकारला थप्पड खाण्याची खूप सवय आहे, असे ही त्यांनी नमुद केले.

सांगलीत पत्रकारांशी बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर सडेतोड टीका केली. चंद्रकांत पाटील म्हणाले, सहकार खाते काय, प्रविण दरेकरांचे काय, ते कोणालाही अपात्र करण्याच्या मनस्थितीत आहेत. सत्तेचा जेवढा दुरूपयोग करायचा तेवढा करत आहेत. लातूर जिल्हा बँक निवडणुकीत भाजपचे सगळे अर्ज अपात्र ठरवले. त्यानंतर आम्ही अपिलात गेलो. त्यावेळी दहा अर्ज पात्र ठरले. आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो असतो तर सगळेच अर्ज पात्र ठरले असते.

Chandrakant Patil

चंद्रकांत पाटील अटल संपर्क अभियानात सहभागी; पाहा व्हिडिओ

मुळात ते मजूर आहेत का, काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते मजूर आणि ऊस तोड मजूरातून बँकेवर संचालक म्हणून जातात. त्यामुळे या सर्वांचेच अर्ज काढा, अशी आमची मागणी आहे. स्वतः दरेकर एकाच वेळी दोन प्रवर्गातून निवडून आले आहेत. त्यांना कोणताही प्रॉब्लेम नाही. ज्या प्रवर्गातून ते अपात्र ठरवले आहेत, त्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत. गेल्या दोन वर्षात महाविकास आघाडी कोर्टात जाऊन जिंकल्याचे एक उदाहरण द्या. मी मात्र, किती वेळा हारली त्याची मोठी यादीच देतो.

Chandrakant Patil

जनतेच्या दरबारात न्याय मिळतो; प्रवीण दरेकर, पाहा व्हिडिओ

अगदी परमवीर सिंगापासून वाझेंपर्यंत ते अगदी पंधरा हजार ग्रामपंचायतींवर कार्यकर्ता प्रशासक नेमायला निघाले होते. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने असे ठोकले की घटना कळते का नाही तुम्हाला, अशी विचारणा केली होती. निवडून न आलेल्या व्यक्तीच्या हातात ग्रामपंचायतींची सत्ता देता काय, असे सुनावले होते. त्यांच्यातीलच एका मंत्र्यांच्या जावयाला पंधराशे कोटींच्या टेंडरची दिलेली वर्क ऑर्डर कोर्टाने रद्द केली. त्यामुळे दरेकरांच्या प्रकरणात आम्ही सर्वोच्च न्यायालययात जाणार असल्याचे त्यांनी नमुद केले.

Chandrakant Patil

सिंधुदुर्ग पोलिसांनी कायदा पाळायचाच नाही असं ठरवलयं -देवेंद्र फडणवीस

यापूर्वी २००९ ते २०१४ पर्यंत शेवटी शेवटी शरद पवार साहेबांनीच मुख्यमंत्र्यांच्या हाताला लकवा झालाय. ते फाईलवर सहीच करत नाहीत, अशी टीका केली होती. बाबांची स्टाईलच होती, एक पान चांगले असले तरी संपूर्ण फाईल बघत होते. त्यानंतर हातातला पेन ते खिशाला लावत आपण नंतर बघू, असे म्हणत होते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या आधी दोन महिने काँग्रेसने सरकारचा पाठींबा काढून घेतला होता, ही आठवण सांगून चंद्रकांत पाटील म्हणाले, आताच्या सरकारमधील यांनाही हातालाच नव्हे मेंदूला पण लकवा झालेला आहे.

Chandrakant Patil

आदित्यने माझा ताण हलका केला : उद्धव ठाकरे

त्यांची बुध्दीच चालत नाही, निर्णयच करत नाहीत. त्यांनी आतापर्यंत पाच आयएएस अधिकारी घालवलेत. एसटीचा संप कशासाठी लांबला, असा प्रश्न करून एकत्र बसून आम्ही तुम्हाला लगेच सरकारी कर्मचारी म्हणू शकत नाही, पण फायदे देऊ शकतो, असे सांगयला हवे होते. मुळात सरकारी कर्मचाऱ्यांचे फायदे जे देवेंद्रजींनी मराठा आरक्षणाच्याबाबतीत दिले. मराठा आरक्षण मिळेपर्यंत त्यांनी २० ते २२ सुविधा दिल्या, ज्या ओबीसींना मिळत होत्या. त्यामुळे मराठा समाज शांत झाला. ओबीसी आरक्षण हा कायदेशीर विषय आहे. आरक्षण मिळपर्यंत ज्या सुविधा ओबीसींना मिळतात त्या तुम्हालाही मिळतील, असे त्यांनी सांगितले होते.

Chandrakant Patil

सूडाचं राजकारण न करण्याचा आमचा निर्णय- शरद पवार,पाहा व्हिडिओ

तसेच त्यांनी धनगर आरक्षणाबाबतही असेच केले. तुम्हाला आरक्षण मिळेपर्यंत एससी एसटीच्या सुविधा तुम्हाला मिळतील, असे सांगितले होते. त्यानंतर २२ योजना आखून त्यासाठी एक हजार कोटी दिले. आज हे सगळे बंद पडले आहे, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले. आज एसटी कर्मचाऱ्यांच्या ६० वर आत्महत्या झाल्या. २५ टक्के लोक कामावर हजर झाले. बाकीच्यांना निलंबित करत आहेत. असे करत राहिले तर आणखीन आत्महत्या वाढतील. आजच शिरवळच्या एसटी कर्मचाऱ्यांचा फोन आला होता, आम्हाला किमान रेशन तरी द्या. आम्ही त्यांना २२७ जणांचे रेशन घरपोच देणार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.

Chandrakant Patil

जिल्हा बँकेतील विजयावर नारायण राणे म्हणाले, हा तर अकलीने मिळवलेला विजय!

या सरकारने कर्ज काढले पण त्याचा वापर कोविडमध्ये केला नाह एसटी कर्मचाऱ्यांसाठी केला ना कर्जमाफी केली. मग कर्ज गेले कुठे, असा प्रश्न उपस्थित करून चंद्रकांत पाटील म्हणाले, त्यांनी हे कर्ज २५ /१५ योजनेसाठी, आमदारांना खुष करण्यासाठी ऐन कोरोना काळात आमदार निधी दोनचा चार कोटी केला. साडेतीनशे आमदारांचे सातशे कोटी खाडकण दिले. शेतकरी नुकसान भरपाई देण्यास मात्र, यांच्याकडे पैसे नव्हते. कोविडमध्ये गेलेल्यांच्या कुटुंबियांना मदत द्यायला पैसे नाहीत. महिलांवरील अत्याचार, अन्याय होत असताना त्यांना मदत देता येत नाहीत. त्यामुळे मी म्हणतो तसे यांच्या हातालाच नव्हे बुध्दीलाही लकवा झालेला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.