RBI withdraw Rs 2,000 Note : नोटबंदीवर अजित पवार म्हणाले.."महिलांकडे पैसे ठेवलेले असतात.. ; ..आधी त्या नोटा बदलून घ्या !

Ajit Pawar on RBI withdraw Rs 2,000 : एक प्रकारची आर्थिक शिस्त आम्ही ठेवली होती.
RBI Announcement Today
RBI Announcement Today Sarkarnama

Ajit Pawar on RBI withdraw Rs 2,000 : "भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India) चलनातील दोन हजार रुपयांची नोट बाद करण्याचा निर्णय घेतला आहे. आता नागरिकांना 2000 रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी 4 महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. या निर्णयावरून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. (ajit pawar on RBI withdraw Rs 2,000 notbandi)

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार नोटबंदीवर म्हणाले, " मागे काय तर जुन्या हजारच्या नोटा बंद केल्या. काल फतवा काढला दोन हजार ची नोट बंद केली. अरे काय चाललंय काय? लोकांना वाटत मोठ्या लोकांकडे असतील नोटा. पूर्वीच्या काळी पैसे जपुन ठेवायचे. महिलांकडे पैसे ठेवलेले असतात. जा आणि सप्टेंबरच्या आधी त्या नोटा बदलून घ्या," अजित पवार कोल्हापुरात बोलत होते.

RBI Announcement Today
Ajit Pawar : अजितदादांनी शिंदे सरकारला सुनावलं..; म्हणाले, 'सत्तेचा ताम्रपट घेऊन कोणी..'

काल दोन हजारच्या नोटांसंदर्भात रिजर्व्ह बँकेने मोठा निर्णय घेतला. 30 सप्टेंबपर्यंत दोन हजाराच्या नोटा बँकेत जमा करण्याचे आदेश देण्यात रिझर्व्ह बँकेने दिले आहेत. रिझर्व्ह बँकेने दोन हजारांच्या नोटा जमा करण्यासाठी 23 मे ते 30 सप्टेंबर अशी मुदत दिली आहे.

"देशाच्या भल्याकरीता एखादा निर्णय असेल तर आमचं काही म्हणणं नाही. देशहित महत्त्वाचं असतं हे मला तुम्हाला सांगायचं आहे. मी राज्याचं अर्थखातं पाहिलं आहे, राज्याचे अर्थमंत्री म्हणून जयंत पाटील यांनीही काम पाहिलं आहे. एक प्रकारची आर्थिक शिस्त आम्ही ठेवली होती," असे ते म्हणाले.

RBI Announcement Today
Subhash Maharia Join BJP : काँग्रेसला मोठा धक्का ; तीन वेळा खासदार असलेले माजी मंत्री भाजपमध्ये..

"आमची एवढीच भावना असते की विकास झाला पाहिजे. कोरोनाचं सावट असताना मी राज्याचा अर्थमंत्रीही होतो. त्यावेळी अँब्युलन्स, कोरोना व्हॅक्सिनचे डोस, जंबो रुग्णालय यासह आम्ही कमी पडलो नाही. उत्पन्न घटलं होतं पण आम्ही राज्याला पुढे नेत होतो," अशी माहिती यावेळी अजित पवार यांनी दिली.

अजित पवार म्हणाले, "आम्ही एक प्रकारची आर्थिक शिस्त ठेवली होती. आमची एवढीच भावना असते की विकास झाला पाहिजे. कोरोनाचं सावट असताना मी राज्याचा अर्थमंत्रीही होतो. त्यावेळी अँब्युलन्स, कोरोना व्हॅक्सिनचे डोस, जंबो रुग्णालय यासह आम्ही कमी पडलो नाही. उत्पन्न घटलं होतं पण आम्ही राज्याला पुढे नेत होतो,"

"सत्ता बदलत असते. हे कायमचे बसायला गेलेले नाही. जनता दाखवून देईल उद्याच्या विधानसभा निवडणुकीत कर्नाटकात कसे दाखवले. सत्तेचा ताम्रपट घेऊन कोणीही जन्माला येत नाही. सरकार बदलल्यावर आम्ही त्यांची कामे बंद केली नाहीत," असा टोला अजित पवारांना सत्ताधाऱ्यांना हाणला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com