जिल्ह्यात मुश्रीफ अन् बंटी यांच्यासोबत असलो तरी राज्यात भाजपसोबतच : आमदार विनय कोरे

जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीवरुन जिल्ह्यातील राजकारण तापले आहे.
mla vinay kore clarifies about gokul election and alliance with bjp
mla vinay kore clarifies about gokul election and alliance with bjp

कोल्हापूर : जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीत गृहराज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत असलो तरीही राज्याच्या राजकारणात मी भाजपसोबतच असणार आहे, अशी माहिती आमदार विनय कोरे यांनी आज दिली. 

शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत कोरे बोलत होते. ते म्हणाले की, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी गोकुळची निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढणार असल्याची भूमिका जाहीर केली आहे. परंतु, ही महाविकास आघाडी प्रत्यक्षात होऊ शकत नाही, असे मला वाटते. केवळ माझ्यापुरते बोलायचे झाल्यास मी जिल्ह्याच्या राजकारणात मुश्रीफ यांच्यासोबत एकत्रित राजकारण करीत आलो आहे. त्याप्रमाणे गोकुळचीही निवडणूक लढवत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील निवडणुका आणि राज्यातील राजकारणाचा व विधानसभेत भाजपला जे समर्थन केले आहे. ती भूमिका कायम आहे. 

राज्यात भाजपचा घटक पक्ष म्हणून आम्ही काम करत आहोत. वास्तविक आमदार पी. एन. पाटील हे काँग्रेसचे आहेत. अप्रत्यक्षपणे महाडिक यांना जर भाजपचे मानले. तर, काँग्रेसचा एक गट, शिवसेनेचा एक गट निर्माण होऊन महाविकास आघाडीचे जसेच्या तसेच सूत्र लागू होत नाही. परंतु, शेतकऱ्यांना न्याय देण्याची माझी भूमिका आहे. काही लोक आमच्यासोबत आले. त्याचा मला निश्‍चित आनंद आहे, असे कोरे यांनी सांगितले. 

अनेक वर्षापासून सत्ताधारी पॅनेल विरोधात आम्ही लढतोय. गेल्या निवडणूकीत हसन मुश्रीफ आणि के. पी. पाटील पॅनेलमध्ये यामध्ये यावेत यासाठी प्रयत्न केले पण ते आले नाहीत. त्यामुळे सतेज पाटील आणि आम्ही मिळून ती निवडणूक लढवली होती. त्यावेळपासून यामध्ये संघर्ष आम्ही केला. गेल्यावेळी दोन जागा विजयी झाल्या. या संघर्षात सातत्य राहिले आहे. सत्ताधाऱ्यांकडून काही चुका झाल्या असून, त्याचा विरोधकांना फायदा होणार आहे, असेही कोरे यांनी स्पष्ट केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com