आदित्यसाहेब शिरोळमध्ये या आणि दुप्पट मतांनी विधानसभेत जा!

शिरोळ हा शिवसेनेचा सुरक्षित मतदार संघ आहे. तालुक्‍याच्या विकासासाठी रात्रंदिवस काम करुन हे सुरक्षित वलय निर्माण केला आहे. विधानसभा निवडणूकीत पुन्हा तालुक्‍यात भगवेच वादळ असेल. आदित्य ठाकरे यांना शिरोळमधून उमेदवारी दिल्यास त्यांना उच्चांकी मतांनी निवडून आणू.- आमदार उल्हास पाटील
आदित्यसाहेब शिरोळमध्ये या आणि दुप्पट मतांनी विधानसभेत जा!

जयसिंगपूर ( कोल्हापूर) : युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांना शिरोळ विधानसभा मतदार संघातून उमेदवारी द्या. माझ्यापेक्षाही दुप्पट मतांनी निवडून आणण्याचा शब्द शिरोळचे आमदार उल्हास पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना दिला. कोल्हापूर दौऱ्यावेळी अंबाबाईच्या साक्षीने आमदार पाटील यांनी आदित्य ठाकरे यांच्यासाठी आमदारकी पणाला लावण्याचा निर्धार बालून दाखविला. 

युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे प्रथमच विधानसभेत जाण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे एक सुरक्षित मतदार संघ म्हणून आमदार पाटील यांनी उध्दव ठाकरे यांच्यापुढे हा प्रस्ताव ठेवला. दरम्यान, श्री ठाकरे यांनी योग्य वेळी निर्णय घेऊ असे सांगितले. शिरोळ तालुक्‍याच्या इतिहासात प्रथमच उल्हास पाटील यांच्या रुपाने विधासभेवर भगवा फडकला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेत जिल्हा उपाध्यक्षपदावर कार्यरत असणाऱ्या श्री पाटील यांना उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी संघटनेला सोडचिठ्ठी देऊन ऐनवेळी भगवा खांद्यावर घेतला. 

दत्त साखर कारखान्याचे तत्कालीन अध्यक्ष स्व. डॉ. सा. रे. पाटील, शरद साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर, स्वाभिमानीचे उमेदवार सावकर मादनाईक यांना नाकारुन मतदारांनी आमदारकीचे मुकूट उल्हास पाटील यांना परिधान केले. 

गतवर्षी दिवसभर शिरोळ तालुक्‍याच्या दौऱ्यात असताना आमदार पाटील यांना मंत्री करा अशा भावना मतदारांनी व्यक्त केल्यानंतर उल्हास पाटील हे माझे चांगले मित्र आहेत आणि ते माझ्यासाठी मंत्र्यापेक्षाही मोठे असल्याची भावनाही श्री ठाकरे यांनी व्यक्त केली होती. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com