वैद्यकीय सुविधेसाठी देवस्थान समितीचे दोन कोटी रूपये

मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक कोटी पन्नास लाख रुपये देत असून, पन्नास लाख रुपये जिल्हाधिकारीकार्यालयाकडे सुपूर्द करणार आहोत.
mahesh jadhav declares two crores for health facilities
mahesh jadhav declares two crores for health facilities

कोल्हापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी वैद्यकीय सुविधेसाठी पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीतर्फे दोन कोटी रुपयांची मदत जाहीर करत असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

पत्रकात म्हटले आहे की, मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक कोटी पन्नास लाख रुपये देत असून, पन्नास लाख रुपये जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सुपूर्द करणार आहोत.

जिल्ह्यासाठी देण्यात येणाऱ्या 50 लाखांपैकी 25 लाख रुपये ग्रामीण व नागरी आरोग्य, तर 25 लाख रुपये सीपीआरमधील वैद्यकीय सेवेसाठी खर्च करण्यात यावेत.

प्रत्येकाने आपापल्या कुटुंबातील सदस्यांची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. कोणीही घराबाहेर पडू नये. या संकटावर मात करण्यासाठी सीपीआर, महानगरपालिका, जिल्हा पोलिस प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन चांगल्याप्रकारे काम करत आहे. विविध स्तरांतून मदत जाहीर केली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून देवस्थान समितीतर्फे शासनाकडे मदत सुपूर्द करत आहोत, असे जाधव यांनी म्हटले आहे.  पत्रकावर कोषाध्यक्ष वैशाली क्षीरसागर, सचिव विजय पोवार, शिवाजी जाधव, राजेंद्र जाधव, राजाराम गरुड, चारुदत्त देसाई व शिवाजी साळवी यांची नावे आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com