महाडिक-मंडलिकांच मिटलं : शिंदे गटात प्रवेशाआधी मंडलिकांची महाडिकांशी झाली होती चर्चा...

सुरवातीला उद्धव ठाकरे Udhav Thackeray यांची बाजू घेणाऱ्या संजय मंडलिक Sanjay Mandlik यांनी 'यु टर्न' घेत एकनाथ शिंदे Eknath shinde group गटात प्रवेश केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या.
Dhananjay Mahadik, Sanjay Mandlik
Dhananjay Mahadik, Sanjay MandlikSarkarnama

कोल्हापूर : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करून भाजपाबरोबर युती केल्यापासून राज्याच्या राजकारणात अनेक समीकरण बदलली आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील कट्टर विरोधक महाडिक गट आणि मंडलिक गट एकत्र आला आहे. खासदार संजय मंडलिक यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडताना कट्टर विरोधक खासदार धनंजय महाडिक यांच्याशी चर्चा केली होती, अशी माहिती धनंजय महाडिक यांनी दिली.

'आमचं ठरलंय' असं म्हणत राज्यात महाविकास आघाडी होण्याअगोदर कोल्हापूरमध्ये शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आले. या सगळ्या राजकारणात काँग्रेस, राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिक यांना मोठा पराभव झाला. त्यानंतर मंडलिक- महाडिक वाद गाजत होता.

Dhananjay Mahadik, Sanjay Mandlik
संजय मंडलिक व हसन मुश्रीफांच्या भेटीत काय झाले?

या दोन्ही शक्तीचा कोल्हापूरमध्ये मोठा प्रभाव आहे. निवडणुकीनंतर धनंजय महाडिक भाजपात गेले. त्याना अनपेक्षित पणे राज्यसभेवर संधी मिळाली. त्यामुळे भाजपा - शिंदे युतीपुढं कोल्हापूरचा लोकसभेचा उमेदवार कोण हा प्रश्न निर्माण झाला होता. सुरवातीला उध्दव ठाकरे यांची बाजू घेणाऱ्या संजय मंडलिक यांनी 'यु टर्न' घेत एकनाथ शिंदे गटात प्रवेश केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या.

Dhananjay Mahadik, Sanjay Mandlik
Kolhapur : मंत्रिमंडळ विस्तारासाठी विरोधकांना मोर्चे काढावे लागतील... सतेज पाटील

ज्या माजी मंत्री सतेज पाटील यांनी मंडलिकांना निवडून आणले त्यानाही धक्का होता. मात्र मंडलिकांनी व्यवस्थित फिल्डिंग लावून निर्णय घेतला होता. प्रवेश करण्याआधी त्यानी देवेंद्र फडणवीस आपल्याशी चर्चा केली असल्याची माहिती स्वतः धनंजय महाडिक यांनी दिली. यापुढच्या काळात मंडलिक गटाशी आघाडी होऊ शकते असही सूचक वक्तव्य त्यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com